Mohammed Shami  esakal
क्रीडा

Mohammed Shami : चार सामने बेंचवर असलेल्या शमीने पहिल्याच चेंडूवर केला धमाका; कुंबळेला टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने भारताने त्याच्या जागी सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूरच्या ऐवजी मोहम्मद शमीला संघात स्थान दिले.

मोहम्मद शमी हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपला पहिलाच सामना खेळत आहे. या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला बाद करत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. या विकेटसोबतच शमीने एक मोठा माईलस्टोन देखील पार केला आहे.

भारताकडून आयसीसी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत मोहम्मद शमी आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने 12 डावात 32 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अनिल कुंबळेला (18 डावात 31 विकेट्स) मागे टाकले.

या यादीत दुसऱ्या स्थानावर 33 सामन्यात 44 विकेट्स घेणारा जवागल श्रीनाथ आहे. तर 23 सामन्यात 44 विकेट्स घेणारा जहीर खान अव्वल स्थानावर आहे.

धरमशाला स्टेडियमवरील न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मोहम्मद सिराजने सार्थ ठरवत फॉर्ममध्ये असलेल्या डेवॉन कॉनवे शुन्यावर बाद केले.

न्यूझीलंडची अवस्था 1 बाद 9 धावा अशी झाल्यानंतर रचिन रविंद्र - विल यंग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रोहितने मोहम्मद शमीकडे चेंडू सोपलवा.

सामन्याने नववे अन् यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले षटक टाकणाऱ्या मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर यंगचा 17 धावांवर त्रिफळा उडवला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT