Hasin Jahan On Mohammed Shami sakal
क्रीडा

Mohammed Shami : मोहम्मद शमीवर बायको हसीन जहाँने पुन्हा केला गंभीर आरोप, म्हणाली...

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाहनंतर काही वर्षाने शमीवर बायकोने बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत.

Kiran Mahanavar

Hasin Jahan On Mohammed Shami : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीन जहाँने यावेळीही मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केला आहे. शमीने मुलीसोबत गैरवर्तन केल्याची जोरदार चर्चा आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत बऱ्याच दिवसांपासून वेगळी राहत होती. हसीन जहाँ ही व्यवसायाने अभिनेत्री आहे, सध्या ती तिच्या बंगाली भाषेतील चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हसीन म्हणाला की, शमीला आपल्या मुलीला भेटण्यात रस नाही. इतकंच नाही तर सर्वांनी आपल्या मुलीसोबत वाईट वर्तन केल्याचा आरोपही केला आहे.

हसीन जहाँने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी शमीशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, मुलगी खूप मोठी होत आहे. इतकी वर्षे झाली, शमीने मुलीला गिफ्टही पाठवलेले नाही. मुलगी मोठी होत असून, तिने याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. मागच्या वाढदिवसाला मुलगी माझी विचारपूस करत होती, म्हणून मी शमीशी बोलायला सांगितले, गिफ्ट पाठवायला सांगितले. शमीने 100 रुपयांचे कपडे पाठवले कारण ते रस्त्यावर विकले जातात. ते कपडे खूप छोटे होते. मला आश्चर्य वाटले की करोडो कमवणाऱ्याने आपल्या मुलीसाठी इतके घाणेरडे कपडे पाठवले.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह 7 एप्रिल 2014 रोजी झाला होता. काही वर्षांनंतर तिने शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत. 2018 साली मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. 17 जुलै 2015 रोजी शमी देखील मुलीचा बाप झाला होता. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता, मात्र अद्याप घटस्फोट झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : दिवाळी संपली! भिडे पूल पुणेकरांसाठी बंद

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

SCROLL FOR NEXT