Mohammed Siraj 3 Wickets India Good Slog Over Bowling  esakal
क्रीडा

IND vs SA : सिराजचा भेदक मारा! टीम इंडियाची स्लॉग ओव्हरमधील गोलंदाजी सुधारली

अनिरुद्ध संकपाळ

India Vs South Africa 2nd ODI : भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 278 धावात रोखले. भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेला 50 षटकात 7 बाद 278 धावांपर्यंतच मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 10 षटकात फक्त 57 धावा करता आल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 38 धावात 3 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून एडेन माक्ररम 79 तर रीझा हेंड्रिक्सने 74 धावांची खेळी केली. मिलरने 34 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र क्विंटन डिकॉक (5) आणि मलान (25) स्वस्तात माघारी परतले. 10 षटकात 40 धावांवर 2 फलंदाज गमावल्यानंतर आफ्रिकेने सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, एडेन माक्ररम आणि भारताविरूद्ध पहिल्यांदाच खेळणाऱ्या रीजा हेंड्रिक्सने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. हेंड्रिक्सने आक्रमक फलंदाजी करत पहिल्यांदा अर्धशतकी मजल मारली. त्यानंतर माक्ररमने आपले अर्धशतक पूर्ण करत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली.

रीझा हेंड्रिक्स आणि एडेन माक्ररम यांनी दोघांनी अर्धशतके ठोकत तिसऱ्या विकेटसाठी 129 चेंडूत 129 धावांची दमदार भागीदारी रचली. अखेर ही जोडी मोहम्मद सिराजने फोडली. त्याने हेंड्रिक्सला 74 धावांवर बाद केले. हेंड्रक्स बाद झाल्यानंतर आलेल्या हेन्रिच क्लासेनने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवण्यास सुरूवात केली होती. मात्र कुलदीप यादवने त्याला 30 धावांवर बाद करत आफ्रिकेला चौथा धक्का दिला.

कुलदीपने क्लासेनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने 89 चेंडूत 79 धावांची खेळी करणाऱ्या एडेन माक्ररमला बाद केले. यानंतर डेव्हिड मिलर आणि पार्नेल खेळपट्टीवर आले. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 10 षटकात टिच्चून मारा करत या दोघांना हात खोलण्याची संधी दिली नाही. शार्दुल ठाकूरने वेन पार्नेलला 16 धावांवर बाद करत आफ्रिकेला सहावा धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद सिराजने शेवटच्या षटकात केशव महाराजला 5 धावांवर बाद करत आफ्रिकेला 50 षटकात 7 बाद 278 धावांवर रोखले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT