IND vs SL Mohammed Siraj  esakal
क्रीडा

IND vs SL : सिराजने लंका पेटवली; गतविजेत्यांच्या नावावर खराब रेकॉर्डची झाली नोंद

अनिरुद्ध संकपाळ

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेसाठी मोहम्मद सिराज डोकेदुखी ठरला. सिराजने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 50 धावात गुंडाळले. श्रीलंकेची ही वनडे क्रिकेटमधील भारताविरूद्धची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.

जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात लंकेला पहिला धक्का दिला तर सिराजने चौथ्या षटकात 4 विकट्स घेत श्रीलंकेची अवस्था 4 षटकात 5 बाद 12 धावा अशी केली.

सिराजने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाची शिकार करत आपला पाचवा बळी टिपला. त्यानंतर 17 धावा करणाऱ्या कुसल मेंडीसला देखील बाद करत लंकेला सातवा आणि मोठा धक्का दिला. मेंडीसच्या रूपाने सिराजने आपला सहावा बळी टिपला.

हार्दिक पांड्या आणि बमराहने श्रीलंकेची अवस्था 7 बाद 33 धावात केली. त्यानंतर हार्दिक पांड्याने दुनिथ वेल्लालागे (8), प्रमोद मदुशान (1) आणि मथिशा पथिराना (0) यांची विकेट घेत लंकेचा डाव 50 धावात गुंडाळला. आशिया कपच्या फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय येईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र भारताने लंकेला 50 धावात गुंडाळात सामना लवकर उरण्याची शक्कल लढवली आणि वरूण राजांना देखील मात देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT