Mohammed Siraj Statement About Ravi Shastri  esakal
क्रीडा

कठीण काळात रवी शास्त्रींनी मला साथ दिली : सिराज

सकाळ डिजिटल टीम

भारताने 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गाबा कसोटी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली होती. गाबा कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दमदार गोलंदाजी करत पाच विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच त्याचा वडिलांचे मोहम्मद गौस यांचे निधन (Mohammed Siraj Fathers Death) झाले होते. मात्र सिराजने वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला होता. या कठिण प्रसंगी तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सिराजला सावरले होते.

मोहम्मद सिराजने बॅक स्टेज विथ बोरिया या कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले की, 'ज्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी रवी सरांनी मला साथ दिली. ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले तू या दौऱ्यावर पाच विकेट्स घ्यावात अशीच तुझ्या वडिलांची इच्छा असणार.' यावेळी मी खूप भावूक आणि उदास झालो होतो. मला कळत नव्हते की काय होत आहे. आम्ही कडक विलगीकरणामध्ये देखील होतो.'

सिराज पुढे म्हणाला की, 'माल समजत नव्हते की काय करायचं आहे. मला घरी जायला हवं का की इथेच रहायचं आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हे समजत नव्हते. त्यावेळी मी विचार केला की मी परत गेलो तरी मला विलगीकरणात जावे लागणार होते. त्यावेळी मी ऑस्ट्रेलियात थांबण्याचा निर्णय घेतला. यामुळे मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकणार होते.'

मोहम्मद सिराजने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 29.64 च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यात ( वनडे, टी 20) 9 आंतरराष्ट्रीय सामने खेळत 10 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

'सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत'; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT