Mohammed Siraj esakal
क्रीडा

Mohammed Siraj : सिराजच्या चौथ्या षटकात असं नेमकं काय घडलं... 4 विकेट्सपेक्षा चर्चा फक्त चौकाराचीच!

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सामन्याच्या चौथ्या षटकात 4 विकेट्स घेत श्रीलंकेचे कंबरडेच मोडले. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट घेतली. याचबरोबर आपल्या पुढच्या षटकात कर्णधार दसुन शानकाला शुन्यावर बाद करत 3 षटकात 4 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

मात्र मोहम्मद सिराजच्या या विकेट्स सोबतच त्याने आपल्याच गोलंदाजीवर डिसेल्वाने मारलेला चौकार आडवण्याचा केलेला प्रयत्न हा वाखाण्या जोगा होता. वेगवान गोलंदाज असूनही तसेच षटकात आधी तीन विकेट्स घेऊनही या चार धावा आडवण्यासाठी तो सीमारेषेपर्यंत धावत गेला.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनलला टॉसपूर्वीच पावसाचे ग्रहण लागले होते. मात्र वरूणराजा प्रसन्न झाला अन् सामना उशिरा का असेना सुरू झाला. गतविजेत्या श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र हा निर्णय पहिल्याच षटकात आत्मघातकी ठरला. जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच चेंडूवर कुसल परेराला शुन्यावर बाद केले. यानंतर सामन्याच्या चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने धमाका केला.

त्याने पथुम निसंकाला पहिल्याच चेंडूवर 2 धावांवर बाद केले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिराजने सदिरा समरविक्रमाला आणि चौथ्या चेंडूवर चरिथ असलंकाला शुन्यावर बाद करत हॅट्ट्रिक चान्स निर्माण केला.

मात्र त्यानंतर आलेल्या धनंजया डिसेल्वाने चौकार मारत सिराजच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. मात्र सिराजही जिद्दी! जरी डिसेल्वाने चौकार मारला तरी चर्चा मात्र सिराजचीच झाली. त्याने चेंडू टाकल्यानंतर ज्या प्रकारे चौकार आडवण्यासाठी सीमारेषेपर्यंत धाव घेतली ते पाहून आधी टीम इंडियाचे खेळाडू हसले मात्र त्याच्या प्रयत्नाला दाद देत त्याची पाठ देखील थोपटली. सध्या सोशल मीडियावर हाच व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT