Mohammed Siraj Air Vistara esakal
क्रीडा

Mohammed Siraj : माझी बॅग तेवढी लवकर द्या... मोहम्मद सिराजने केली कळकळीची विनंती

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj : भारताने बांगलादेशविरूद्धची दुसरी कसोटी 3 विकेट्सने जिंकत मालिका 2 - 0 अशी खिशात घातली. दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने भारतीय संघाचा चांगलाच घाम काढला. बांगलादेशमधील कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ मायदेशत परतला. दरम्यान, भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारतात परतताच एक ट्विट केले. सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावरून परतल्या परतल्या श्रीलंकेविरूद्ध मायदेशात होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संघाची घोषणा झाली. सर्वत्र संघनिवडीबाबत चर्चा सुरू असताना मोहम्मद सिराजला मात्र त्याच्या बॅगची चिंता लागून राहिली होती. अखेर मोहम्मद सिराजने ट्विटवर Air Vistara टॅग करत ट्विट केले.

मोहम्मद सिराज आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'त्या बॅगेत माझ्या सर्व महत्वाच्या वस्तू आहेत. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की माझी बॅग हैदराबादमध्ये माझ्यापर्यंत लवकरात लवकरात पोहचवण्यात यावी.' (Sports Latest News)

दरम्यान, श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी मोहम्मद सिराजची संघात निवड करण्यात आली आहे. मात्र टी 20 मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही.

श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठीचा भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT