World Athletics Federation  sakal
क्रीडा

World Athletics Federation : बॉक्सिंगमधील ऑलिंपिक पदकविजेत्यांवर धनवर्षाव ; आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून निर्णय अमान्य

जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून काही दिवसांपूर्वीच पॅरिस ऑलिंपिकमधील ‘सुवर्ण’विजेत्यांवर धनवर्षाव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

जीनेव्हा : जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून काही दिवसांपूर्वीच पॅरिस ऑलिंपिकमधील ‘सुवर्ण’विजेत्यांवर धनवर्षाव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. आता आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडूनही (आयबीए) ऑलिंपिकमधील पदकविजेत्याला ५० हजार डॉलर बक्षिसाच्या रूपात देण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले; मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) आयबीएशी संबंध तोडले आहेत. त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून घेण्यात आलेला निर्णयही आयओसीकडून अमान्य करण्यात आला आहे.

आयबीएकडून पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होत असलेले खेळाडू, प्रशिक्षक यांना आर्थिक स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. १३ विविध वजनी गटांमध्ये जगातील बॉक्सर पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी पुरुष तसेच महिला खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांसाठी २१ लाख डॉलरची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १० हजार डॉलर देण्यात येणार आहेत.

दरम्यान, आयओसीकडून आयबीएच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. २०१६मधील रिओ दी जेनेरियोच्या ऑलिंपिक लढतींच्या निकालांवरही संशय निर्माण झाला होता. त्यामुळे टोकियोनंतर आता पॅरिस ऑलिंपिकपासून आयबीएला दूर ठेवण्यात आले आहे. आयओसीच्या निर्णयावर आयबीएच्या पदाधिकाऱ्यांकडून टीकाही करण्यात आली आहे.

जागतिक ॲथलेटिक्सच्या निर्णयावरही नाराजी

जागतिक ॲथलेटिक्सकडून काही दिवसांपूर्वी ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेत्यांवर धनवर्षाव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने नाराजी व्यक्त केली होती. २०२८मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२८मधील ऑलिंपिकमध्ये रौप्य व ब्राँझपदक जिंकणाऱ्या खेळाडूंनाही जागतिक ॲथलेटिक्सकडून धनवर्षाव करण्यात येणार आहे.

अरुंधती, अंकुशिताचे विजय

थायलंडमधील बँकॉक येथे बॉक्सिंग या खेळाची पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरी सुरू आहे. भारताच्या अरुंधती चौधरी हिने ६६ किलो वजनी गटात, तर अंकुशिता बोरो हिने ६० किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत पुढे पाऊल टाकले. भारताच्या नरेंदर बेरवाल याला मात्र ९२पेक्षा जास्त किलो वजनी गटात पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

Maha Shivratri 2026: भोलेनाथाच्या दरबारात समान हक्क! महाशिवरात्री 2026 ला त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शन बंद, जाणून घ्या काय झाले बदल

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

SCROLL FOR NEXT