MS Dhoni Daughter Ziva sakal
क्रीडा

हातमाग कारागिराची कमाल, साकारला कापडावर धोनी-जीवामधील प्रेमळ क्षण

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Kiran Mahanavar

MS Dhoni Daughter Ziva : आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. तामिळनाडूतील ईरोड येथील एका हातमाग कारागिराने कपड्यांवर धोनी आणि त्याची मुलगी जीवा धोनी यांचे चित्र कोरले आहे. माहीला हे चित्र इतकं आवडलं की त्याने स्वतः ते विकत घेतलं. धोनीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी धोनीचा हा फोटो सर्वप्रथम शेअर केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये मंत्री यांनी लिहिले की, श्री अप्पुसामी हा एक विणकर आहे. तो ईरोडमध्ये हातमागाचा स्टॉल चालवतो, आणि क्रिकेटचा पण मोठा चाहता आहे. कपड्यांवर आर्टवर्क करताना त्याने एमएस धोनी आणि त्याच्या मुलीचे एकत्र चित्र बनवले आहे. याची माहिती धोनीला कळताच तो स्वत: स्टॉलवर पोहोचला आणि फोटो काढला.

मंत्री जरदोश यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चार फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोत धोनी दिसत आहे, ज्यामध्ये त्याचा हातात कपड आहे, ज्याच्यावर झिवा धोनीचा फोटो कोरला गेला आहे. पांढऱ्या कपड्यावर निळ्या रंगात हे चित्र काढण्यात आले आहे. याशिवाय हातमाग स्टॉल आणि श्री अप्पुसामी हे तीन फोटोमध्ये दाखवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : संजय राऊत यांचा 'वंदे मातरम्' वरुन सरकारवर निशाणा

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT