FIFA MS Dhoni inspired post For Cristiano Ronaldo sakal
क्रीडा

थाला फॉर अ रीजन...! फिफा वर्ल्ड कपपर्यंत पोहोचली धोनीची क्रेझ; रोनाल्डोसोबत माहीला मिळाला ट्रिब्यूट

एमएस धोनीची लोकप्रियता केवळ क्रिकेट विश्वातच नाही तर जगभरात आहे. धोनी जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो आणि चाहते त्याला फॉलो करतात तेव्हा याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत.

Kiran Mahanavar

FIFA MS Dhoni inspired post For Cristiano Ronaldo : एमएस धोनीची लोकप्रियता केवळ क्रिकेट विश्वातच नाही तर जगभरात आहे. धोनी जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो आणि चाहते त्याला फॉलो करतात तेव्हा याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत.

एमएस धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सध्या धोनी फक्त आयपीएलमध्येच खेळताना दिसतो. मात्र त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. धोनीच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की फिफाने क्रिस्टियानो रोनाल्डोचा फोटो 'थाला फॉर ए रीजन' या कॅप्शनसह शेअर केला आहे.

आयपीएल 2024 या संपूर्ण हंगामात एमएस धोनीसाठी सोशल मीडियावर 'थाला फॉर ए रिजन' ट्रेंड करत राहिला. जिथे जिथे 7 नंबर दिसला तिथे चाहत्यांनी 'थला फॉर ए रिजन' असा उल्लेख करायला सुरुवात केली. पण आता हा ट्रेंड फक्त क्रिकेटमध्येच नाही तर फुटबॉलमध्येही फॉलो केला जात आहे. युरो कप 2024 ची सध्या फुटबॉलमध्ये क्रेझ सुरू आहे.

पोर्तुगाल आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील सामन्यापूर्वी फिफाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून क्रिस्टियानो रोनाल्डोचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर फिफाने क्रमांक 7 सोबत 'थाला फॉर ए रिजन' असे कॅप्शन लिहिले आहे.

खरंतर, एमएस धोनीप्रमाणेच रोनाल्डोही 7 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. यामुळेच फिफाने दोन दिग्गजांना एकत्र ट्रिब्यूट दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT