MS Dhoni Gives Lift To Young Cricketer 
क्रीडा

MS Dhoni Viral Video : आईशपथ! चक्क धोनीनं दिली युवा क्रिकेटरला लिफ्ट अन् भाऊ एकदम ढगात..

Kiran Mahanavar

MS Dhoni Gives a Lift To A Young Cricketer on his Bike Video : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही नेहमीच चर्चेत असतो. एमएस धोनीचा पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो रांचीमध्ये एका युवा क्रिकेटरला त्याच्या बाईकवर लिफ्ट देताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, धोनी आपले सराव सत्र पूर्ण केल्यानंतर त्याच्या यामाहा बाइकवर लाँग ड्राईव्हला जाताना दिसत आहे. धोनी बाइक चालवत आहे आणि युवा क्रिकेटर CSK कॅप्टनसोबत राइडचा आनंद घेत आहे.

याच्या काही दिवसांपूर्वी धोनी गोल्फ खेळल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळत होता. धोनी आणि ट्रम्प यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय त्याचा गोल्फ खेळतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. यूएस ओपनमधील पुरुष एकेरीचा उपांत्यपूर्व सामना पाहण्यासाठीही धोनी गेला होता.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून पाचव्या विजेतेपदावर कब्जा केला. त्यानंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर महेंद्रसिंग धोनी अनेकदा त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये त्याच्या आलिशान कार आणि स्पोर्ट्स बाइक चालवताना दिसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT