dhoni_virat 
क्रीडा

Kohli-Dhoni : सर्वत्र धोनी! चक्रावलेल्या विराट कोहलीनं इन्स्टावर केलेली पोस्ट चर्चेत

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली यांची मैत्री जगजाहीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली यांची मैत्री जगजाहीर आहे. आपल्या यशामध्ये धोनीचा खूप मोठा वाटा असल्याचं तो कायमच सांगतो. अनेकदा विराटनं धोनीप्रती सन्मान आणि प्रेम व्यक्त केलं आहे. आता एका प्रसंगावरुन विराटनं पुन्हा एकदा धोनीचे गोडवे गायलेत. (Mahendra singh Dhoni is everywhere Virat Kohli post on Instagram is in discussion)

विराट कोहलीनं सोमवारी इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये धोनीसंबंधी एक पोस्ट केली. यामध्ये त्यानं धोनीचं कौतुक करताना धोनी सर्वत्र असल्याचं म्हटलं आहे. आपल्या स्टोरीमध्ये विराटनं एका पाण्याच्या बाटलीचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर धोनीचा फोटो आहे. सहाजिकचं ही एक जाहीरात आहे, पण कोहली यामुळं चक्रावला. त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं की, धोनी सगळीकडे आहे पाण्याच्या बाटलीवरही!

कसोटीचं कर्णधारपदं सोडल्यानंतर एकमेव धोनीनंच आपल्याला मेसेज केला होता, त्यामुळं पुन्हा फॉर्ममध्ये येण्यास आपल्याला मदत झाल्याचं त्यानं नुकतंच विराट कोहलीनं म्हटलं होतं. यांसह आपल्या यशाचं मोठं श्रेय कोहली कायमच धोनीला देत आला आहे.

हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

विरोट कोहलीनं धोनीच्या नेतृत्वाखाली सन २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर सन २०१२-१३ मध्ये तो तीन फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा रेग्युलर खेळाडू बनला. सन २०१४ मध्ये धोनीनं कसोटी क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर कोहली कसोटीचा कर्णधार बनला. त्यानंतर सन २०१७ मध्ये तो वनडे आणि टी-ट्वेंटीचा कर्णधारही बनला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Bala Nandgaonkar : "राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवा!" बाळा नांदगावकरांचा भाजपला टोला

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

Credit Card Scheme: मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, मर्यादा ५ लाख रुपये, 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT