MS Dhoni  esakal
क्रीडा

MS Dhoni : धोनीवर मॅच फिक्सिंगचे आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांचा तुरूंगवास; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Match Fixing Case : मद्रास उच्च न्यायालयाने भारताची माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मॅच फिक्सिंग केल्याचा दावा करणाऱ्या आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी धोनीने न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती. संपत कुमार यांनी 2013 च्या मॅच फिक्सिंग आणि बेटिंगमध्ये महेंद्रसिंह धोनी देखील सामील होता असा दावा केला होता.

दरम्यान, बार आणि बेंचने दिलेल्या वृत्तानुसार मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि सुंदर मोहन यांनी आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना या निर्णयाविरूद्ध दाद मागण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे.

महेंद्रसिंह धोनीने उच्च न्यायालयात यापर्वी झी मीडिया संपत कुमार आणि इतरांवर मानहानीचा दावा ठोकला होता. न्यूज रिपोर्टमध्ये धोनी 2013 मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करणारे वक्तव्य केल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहचल्याचा आरोप धोनीने केला होता.

आयपीएल 2013 मध्ये झालेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणाचा प्राथमिक तपास आधी संपत कुमार यांच्याकडे होता. धोनीने या सर्वांना या प्रकरणात झी, संपत कुमार आणि इतरांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यात यावं अशी याचिका उच्च न्यायालयात केली होती.

उच्च न्यायालयाने या प्रकरणात झी आणि कुमार यांना धोनीविरूद्ध वक्तव्य करण्यापासून रोखणारा आदेश दिला होता. यानंतर झी, कुमार आणि इतर लोकांनी लेखी उत्तर दिलं होतं. मात्र कुमार यांनी लेखी उत्तरानंतरही धोनीविरूद्ध बदनामी करणारी वक्तव्य त्यानंतरही केली. त्यामुळे धोनीने कुमार यांच्याविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: तुमचा EMI वाढणार? SBI च्या अहवालाने चिंता वाढवली; डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढल्यास किती वाढणार EMI?

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! चिप्स, बिस्किटांसह खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर दिसणार 'हा' इशारा

IND vs NZ, 2nd Test: 'गुरनूरच्या पदार्पणासाठी रस्ते मोकळे, सिराजने वेग परत मिळवावा!', आर अश्विनने टीम इंडियाचा प्लॅन जगाला सांगितला

भिवंडीत नाला साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुर्घटना

Latest Marathi News Live Update: नागपुरात कॉकरोज जनता पार्टीची संविधान बचाव रॅली

SCROLL FOR NEXT