MS Dhoni pays visit to India team at Edgbaston End vs Ind 
क्रीडा

MS Dhoni: एमएस धोनीने इंग्लंडमध्ये घेतली भारतीय खेळाडूंची भेट

माजी महान यष्टीरक्षक फलंदाज शनिवारी 9 जुलैला बर्मिंगहॅमला ही पोहोचला

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या इंग्लंडमध्ये आहे. धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत इंग्लंडला लग्नाचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. महेंद्रसिंग धोनी मात्र रोज इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा. माजी महान यष्टीरक्षक फलंदाज शनिवारी 9 जुलैला बर्मिंगहॅमला ही पोहोचला. (MS Dhoni pays visit to India team at Edgbaston End vs Ind)

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेला. भारतीय संघाची कमान सांभाळल्यानंतर रोहित शर्मा एकामागून एक मालिका जिंकत आहे. एजबॅस्टन टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडवर 49 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामना संपल्यानंतर एमएस धोनीने भारतीय खेळाडूंची भेट घेतली. धोनीने यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि ईशान किशन यांच्याशी संवाद साधताना दिसतात. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ईशानने त्याच्याबरोबर दिसतोय.

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2019 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियाचा भाग नाही पण आयपीएलमध्ये दिसतो आणि खेळाडूंसोबत त्याचा अनुभव शेअर करतो. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली देशासाठी तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात दाखल; हवामान विभागाची माहिती

इबोलाचं संकट! विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत तयार रहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

SCROLL FOR NEXT