MS Dhoni Retirement IG Announcement on Sunday at 2PM
MS Dhoni Retirement IG Announcement on Sunday at 2PM esakal
क्रीडा

MS Dhoni आयपीएलमधून घेणार निवृत्ती ? त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

सकाळ डिजिटल टीम

'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती घेतली आहे. दरम्यान आता आयपीएलमधूनदेखील धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या त्याची एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. उद्या लाईव्ह येऊन मोठी घोषणा करणार असल्याचं धोनीने सांगितलं आहे. त्याचा फोटो देखील धोनीने शेअर केला आहे.(MS Dhoni Retirement IG Announcement on Sunday at 2PM)

इतर खेळाडूंपेक्षा धोनी सोशल मीडियावर फारसा अॅक्टीव्ह नसतो. मात्र अधून-मधून तो एखादी पोस्ट करतो. यातच त्याने शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. जी काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

धोनी या फेसबुकच्या पोस्टमध्ये , “मी 25 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता लाईव्ह (थेट प्रक्षेपण) येणार आहे आणि यावेळी मी एक रोमांचक बातमी शेयर करणार आहे. तुम्ही सगळे उपस्थित असाल अशी आशा आहे.” म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष धोनीच्या लाईव्हकडे लागून राहिले आहे.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. मागच्या आयपीएलवेळी धोनीने निवृत्ती घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, धोनीला चेन्नईच्या मैदानावर निवृत्ती घेण्याची इच्छा आहे. तसं त्याने बोलून देखील दाखवलं होतं. अशात त्याची ही पोस्ट पाहता नेमंक धोनी काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. तसेच त्याने 2013च्या विजेत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचे कर्णधारपद भुषविले होते. त्याने 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या आहेत. तर 350 वनडे सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT