Rohit Sharma becomes an opener because of Dinesh Karthik ms Dhoni esakal
क्रीडा

दिनेश कार्तिकमुळे रोहित शर्मा झाला ओपनर; माजी फिल्डिंग कोचचा दावा

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीमुळे सलामीवर बनला

धनश्री ओतारी

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीमुळे सलामीवर बनला हे सर्वश्रुत आहे. मात्र, यामागे एक मजेदार किस्सा आहे. जो सध्या चर्चेत आला आहे.(Rohit Sharma becomes an opener because of Dinesh Karthik ms Dhoni)

भारतीय कर्णधार गेल्या 8-9 वर्षांपासून सलामीवीर म्हणून डोलत आहे. विश्वचषकापासून द्विपक्षीय मालिकेपर्यंत रोहितने सलामीवीर म्हणून सर्वत्र कमाल दाखवली आहे. सध्या तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. अशातच त्याच्या सलामी भूमिकेसंदर्भात नवा खुलासा समोर आला आहे. यासर्वांमागे दिनेश कार्तिक असल्याचे समजते.

रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हा तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा. पण 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे रोहितला सलामीवीर बनावे लागले. आणि त्यात दिनेश कार्तिकचीही भूमिका आहे. टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी याबाबत एक मजेदार खुलासा केला आहे.

2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कार्तिकमुळे रोहित शर्माला ओपनिंगसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. असा दावा आर श्रीधर यांनी केला आहे.

धोनीने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने ओपनिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सराव सामन्यात दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करत होता, त्यामुळे मधल्या फळीत त्याचे स्थान निश्चित झाले. पण कर्णधार धोनीलाही रोहितला संघात कायम ठेवायचे होते. याच कारणामुळे संघ व्यवस्थापनाने विशेषतः कर्णधार धोनीने रोहितला ओपनिंग करण्यास सांगितले. जो खरोखरच एक उत्तम निर्णय ठरला. असे आर श्रीधर यांनी सांगितले.

रोहितनेही धोनीचा विश्वास खरा ठरवला, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनसोबत डावाची सलामी दिली आणि टीम इंडियाने त्याच वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले. रोहितने नुकतीच सूर्यकुमार यादवसोबत डावाची सुरुवात केली आहे. त्यामुले सूर्यकुमार रोहितचा विश्वास सार्थ ठरवतो को हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT