क्रीडा

INDvsWI : या महत्त्वपूर्ण कामासाठी धोनीने घेतली दोन महिन्यांची विश्रांती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली. त्याने बीसीसीआयकडून दोन महिन्यांची रजा मागून घेतली आहे. या काळात तो निम लष्करी दलात जाऊन देशाची सेवा करणार आहे. 

त्याने हाताला दुखापत झाल्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली असली तरी तो दोन महने विश्रांती घेणार नाही. या काळात तो अत्यंत महत्त्वाचे काम करणार आहे. या काळात तो निम लष्करी दलात सहभागी होणार आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली होती. आता त्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. 

त्याच्या माघार घेण्याचे कारण काहीही असले तरीही आता यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिक उधाण येणार हे स्पष्ट आहे. धोनीने कसोटीमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या तीन ट्‌वेंटी-20, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 

या दौऱयासाठी भारतीय संघाची निवड रविवारी (ता.21) केली जाणार आहे. आता धोनीच्याऐवजी संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला संधी मिळते की आणखी कोणाला हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, आता न्यायमूर्ती अजय गुप्ता यांच्याकडे नीट पेपरफुटीची सुनावणी

Maharashtra Flood Relief: महाराष्ट्राला केंद्राकडून ५०० कोटींच्या 'मदतीचा हात', आगाऊ निधीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध सोलापुरात अदखलपात्र गुन्हा दाखल, काय आहे कारण?

Maharashtra Anti Conversion Law: सक्तीच्या धर्मांतराला राज्यात चाप! कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; ६० दिवसांची पूर्वसूचना आवश्‍यक

Maharashtra Rain: राज्याला दिलासा! अवघ्या ८ दिवसांत १५२ टीएमसी पाण्याची भर; राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT