MS Dhoni 
क्रीडा

MS Dhoni : ऑपरेशनपूर्वी धोनीच्या हाती 'भगवत गीता' ; कॅप्टन कूलच रहस्य उघड...

Sandip Kapde

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) नुकतीच संपली आहे. यावेळी आयपीएलचे विजेतेपद एम एस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने जिंकले. चेन्नईने आयपीएल ट्रॉफीवर कब्जा करण्याची ही पाचवी वेळ होती. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातशी झाला. पण या सगळ्यामध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर धोनी वेगळ्याच अंदाजात दिसला आहे.

गुरुवारी सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी कारमध्ये बसून भगवद्गीतेचे पठण करताना दिसला. धोनीने हातात भगवद्गीता पकडून गाडीत बसल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

आयपीएल 2023 मध्ये चेन्नईचा पहिला सामना गुजरात टायटन्स सोबत झाला होता. या सामन्याच्या 19 व्या षटकात दीपक चहरचा चेंडू थांबवल्यामुळे धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला खेळपट्टीवरच वेदना होऊ लागल्या.

मात्र धोनीने कोणत्याही सामन्यातून विश्रांती घेतली नाही आणि खेळ सुरूच ठेवला. एवढेच नाही तर धोनीला गुडघेदुखीनेही काही काळ त्रास होत आहे. त्यामुळे त्याने उपचारासाठी मुंबईतील क्रीडा ऑर्थोपेडिक तज्ञांचा सल्ला घेतला. फ्रेंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) काशी विश्वनाथ यांनी बुधवारी ही माहिती दिली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मागील हंगामात धोनी गुडघ्यावर पट्टी बांधून खेळताना दिसला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार चाहत्यांचा लाडका महेंद्रसिंह धोनी याच्या गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या विजेतेपदानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी म्हणाला होता की, चाहत्यांनी माझ्यावर ज्याप्रकारे प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यामुळे मी आणखी एक सीझन खेळणे हीच त्यांना माझी भेट असेल फक्त शरीराने साथ द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT