Devon Conway MS Dhoni IND vs NZ 1st T20I ESAKAL
क्रीडा

Devon Conway IND vs NZ : इकडं धोनी गुरूमंत्र देतोय तिकडं कॉन्वे भारताची डोकेदुखी ठरतोय

अनिरुद्ध संकपाळ

Devon Conway MS Dhoni IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात किवींचा सलामीवीर डेवॉन कॉन्वेने पुन्हा एकदा भारताविरूद्ध मोठी खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून सातत्याने टिप्स घेणाऱ्या डेवॉन कॉन्वेने भारताविरूद्ध शतक, अर्धशतकांचा रतीबच लावला आहे. शेवटच्या वनडे सामन्यात कॉन्वेने 136 धावांची दमदार खेळी केली होती.

आता पहिल्या वनडे सामन्यात 52 धावांची अर्धशतकी खेळी करत भारतासाठी डोकेदुखी ठरला. विशेष म्हणजे रांचीत होत असलेल्या या टी 20 सामन्यापूर्वी कॉन्वे आणि महेंद्रसिंह धोनी चर्चा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कॉन्वे हा धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळतो.

पहिल्या टी 20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम न्यूझीलंडला फलंदाजीला पाचारण केले. किवींनीही पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. एलन फिनने कर्णधार हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकात 12 धावा चोपल्या. हाच सिलसिला त्याने अर्शदीप आणि वॉशिंग्टन सुंदरच्या बाबतीतही कायम ठेवला.

मात्र सामन्याच्या 5 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने 23 चेंडूत 35 धावा करणाऱ्या फिनला बाद केले. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॅम्पमनला शुन्यावर बाद करत किवींना दुसरा धक्का दिला. किवींनी पॉवर प्लेमध्ये 2 बाद 47 धावा केल्या.

पाचव्या षटकात पाठोपाठ दोन विकेट्स पडल्यानंतर डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स यांनी किवांचा डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 60 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी किवींचे शतक धावफलकावर लावले. अखेर ही जोडी कुलदीप यादवने फोडली. त्याने ग्लेन फिलिप्सला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर डेवॉन कॉन्वेने भारताविरूद्धचा आपला दमदार फॉर्म पहिल्या टी 20 सामन्यातही कायम राखला. त्याने 35 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी करत किवींना 150 च्या जवळ पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वारजे परिसरात विचित्र अपघात

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

SCROLL FOR NEXT