IND vs AUS Test Series Sarfaraz Khan  esakal
क्रीडा

IND vs AUS Test Series : भारतीय संघात होणार मोठा बदल; 37 सामन्यात 3505 धावा करणाऱ्या फलंदाजाचं पदार्पण?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS Test Series Sarfaraz Khan : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 9 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना नागपूर येथे 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. भारतीय निवडसमितीने पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. मात्र आता या संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर कंबरदुखीने त्रस्त आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीसाठी मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मुंबईच्याच सर्फराज खानला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यरला कंबरदुखीचा त्रास होत आहे. सध्या तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशन करत आहे. त्याला दोन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला कसोटी सामना हा नागपूर येथे होणार आहे. मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळण्याची शक्यता असलेल्या सर्फराज खानने 37 प्रथम श्रेणी सामन्यात आतापर्यंत 3505 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 79.69 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात सर्फराज खानने तीन शतके ठोकली असून तो ज्या प्रकारे धावा करत आहे ते पाहता अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

सर्फराज खानने यंदाच्या रणजी ट्रॉफी हंगामात मुंबईकडून खेळताना 8 डावात 556 धावा केल्या आहेत. त्याने 100 पेक्षा जास्त सरासरी राखत या धावा केल्या आहेत. त्यामुळे सर्फराजला दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत बसवण्यात येत आहे. 2000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या प्रथम श्रेणी फलंदाजांमध्ये ब्रॅडमन याची सरासरी सर्वोकृष्ट आहे. त्यांनी 234 सामन्यात 95.14 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्यांच्या खालोखाल सर्फाराज खानचा नंबर लागतो.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT