Cameron Green IPL 2023 Auction Mumbai Indians esakal
क्रीडा

Cameron Green : एवढी बोली लागण्यासारखं मी केले तरी काय... मुंबई इंडियन्सला घरचा आहेर

अनिरुद्ध संकपाळ

Cameron Green IPL 2023 Auction Mumbai Indians : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला यंदाच्या आयपीएल लिलावात छप्पर फाड के बोली लागली. ऑस्ट्रेलियन खेळाडूला आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 17.5 कोटी रूपये बोली लावत आपल्या कुटुंबात सामावून घेतले. अवघ्या 23 वर्षाच्या ग्रीनने अजून ऑस्ट्रेलियन संघात आपला जम बसवलेला नाही तोवरच त्याला आयपीएलने महागडा खेळाडू करून टाकले.

दरम्यान, कॅमेरून ग्रीनने देखील लिलावाला एक दिवस उलटतो ना उलटतो तोच आपला दम दाखवत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये लालेल्या भल्या मोठ्या जॅकपॉटबद्दलही आपले मत व्यक्त केले. (Sports Latest News)

ग्रीन म्हणाला की, 'स्पष्ट सांगायचं झालं तर मला असं वाटतं की मला एवढी मोठी बोली लागावी असं अजून मी काही केलेलंच नाही. मी फक्त लिलावासाठी माझे नाव दिले आणि हे सगळे झाले. मात्र यामुळे माझ्या विचार करण्याच पद्धतीवर किंवा माझ्या व्यक्तीमत्वावर कोणताच फरक पडलेला नाही. मला माझ्या क्रिकेटवर विश्वास आहे. मला आशा आहे की मी खूप बदलणार नाही.'

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT