Rashid Khan ,Kagiso Rabada sakal
क्रीडा

‘मुंबई इंडियन्स’च्या संघातून रशीद, रबाडा खेळणार

आफ्रिका लीगमध्ये एमआय केप टाऊन संघ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विख्यात लेगस्पीनर रशीद खान, वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, सॅम करन आणि लिएम लिव्हिंगस्टोन आयपीएलमध्ये विविध संघांतून खेळत असले, तरी ते मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य झाले आहेत. दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचाईस असून त्यांचा एमआय केप टाऊन हा संघ आहे आणि त्या संघात हे खेळाडू असणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील या लीगचे नगारे वाजण्यास सुरुवात झाली आहे. स्पर्धेत खेळणाऱ्या सहाही संघांची मालकी आयपीएलमधील विविध संघ मालकांची आहे. लीगच्या नियमानुसार प्रत्येक संघ लिलावाच्या अगोदर पाच खेळाडू निवडू शकतात. यातील तीन खेळाडू परदेशी, एक दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू; तर एक दक्षिण आफ्रिकेतील नवोदित खेळाडू असणे आवश्यक आहे. त्यानुसार एमआय केपटाऊन संघाने आपले पहिले पाच खेळाडू

केले.

रशीद खान, लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन हे परदेशी खेळाडू असून रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे; तर डेवाल्ड ब्रेविस हा नवोदित खेळाडू आहे. मुळात ब्रेविस या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचाच खेळाडू आहे.

एमआय केप टाऊन या संघाची बांधणी आम्ही सुरू केली आहे. त्यानुसार या खेळाडूंची थेट निवड केली आहे, असे रिलायन्स जिओचे कार्याध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले.

या लीगमध्ये खेळाडू करारबद्ध करण्याची घोषणा कालच करण्यात आली. त्यानुसार ३० अव्वल खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. प्रत्येक संघात १७ खेळाडू असणार आहेत.

अद्याप इतर संघांनी करारापूर्वी घेण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली नसली, तरी जॉस बटलर आणि लिव्हिंगस्टोन यांना सर्वाधिक पाच लाख डॉलर मिळणार आहेत. त्यानंतर मोईन अली (४ लाख डॉलर) दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसी (३ लाख ५० हजार डॉलर),कागिसो रबाडा क्विन्टॉन, डिकॉक, ऑईन मॉर्गन आणि सॅम करन (प्रत्येकी ३ लाख डॉलर) अशी रक्कम मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT