IPL MI vs PK Sakal
क्रीडा

IPL 2023 : 'मुंबई इंडियन्स'ला खिजवणाऱ्या पंजाब किंग्जची बोलती मुंबई पोलिसांनीच केली बंद

पंजाब किंग्जने एक फोटो ट्वीट करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती.

वैष्णवी कारंजकर

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये काल झालेला सामना चांगलाच रंगला. मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जकडून पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या क्षणी विशेष कामगिरी करता न आल्याने गेल्या तीन सामन्यात विजय मिळवणाऱ्या मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

त्यानंतर पंजाब किंग्जने ट्वीटर हँडलवरुन मुंबई इंडियन्सची खिल्ली उडवली आहे. पंजाबने मुंबई पोलिसांना ट्वीट करत एक तक्रार केली आहे. पंजाब ज्यावेळी गोलंदाजी करत होता, त्यावेळी अर्शदीप सिंगने २० व्या षटकात स्टंप तोडून टाकला. चेंडूच्या वेगामुळे हा स्टंप तुटला. या तुटलेल्या स्टंपचा फोटो पंजाब किंग्सच्या अकाऊंटवरुन ट्वीट कऱण्यात आला आहे.

हा फोटो शेअर करताना मुंबई पोलिसांनाही टॅग करण्यात आला आहे. तसंच आम्हाला स्टंप तोडल्याची तक्रार दाखल करायची आहे, असंही म्हटलं आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये मुंबई पोलीस म्हणाले, "कुणी कायदा किंवा नियम मोडला असेल, तर आम्ही तक्रारीची दखल घेऊन नक्कीच कारवाई करू. पण स्टंप मोडल्यावर कारवाई करू शकत नाही. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT