Mumbai Reached In Ranji Trophy Final One Step Away From 42th Title
Mumbai Reached In Ranji Trophy Final One Step Away From 42th Title  esakal
क्रीडा

Ranji Trophy : मुंबईने गाठली फायलन; 42 व्या विजेतेपदासाठी मध्य प्रदेशशी भिडणार

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : रणजी ट्रॉफीमधील मुंबई विरूद्ध उत्तर प्रदेश ही दुसरी सेमी फायनल ड्रॉ झाली. मात्र पहिल्या डावाचा आघाडीवर मुंबईने रणजी ट्रॉफीची फायनल गाठली. मुंबईकडून सलामीवीर यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) दोन्ही डावात शतकी खेळी केली. आता 22 जून ते 27 जून दरम्यान, मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात रणजी ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. मुंबई आपल्या 42 व्या विजेतेपदासाठी जोर लावेल तर चार वेळा विजेतेपदाला गवसणी घालणारे 1953 नंतर विजेतेपद पटकावण्याच्या तयारीत असती. (Mumbai Reached In Ranji Trophy Final One Step Away From 42th Title)

दरम्यान मुंबई विरूद्ध उत्तर प्रदेश सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी पाच दिवस उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम गाळायला लावला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने आपल्या पहिल्या डावात 393 धावा केल्या. यात यशस्वी जैसवाल (100) आणि हार्दिक तोमरे (115) शतकी खेळी केली. उत्तर प्रदेशच्या सौरभ कुमारने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. उत्तर प्रदेशला आपल्या पहिल्या डावात 180 धावा करता आल्या. उत्तर प्रदेशकडून शिवम मावीने सर्वाधिक 48 धावा केल्या. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. मुंबईने चार फलंदाजांच्या मोबदल्यात 533 धावा केल्या. अखेर उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांवर दया दाखवत मुंबईने आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबईकडून दुसऱ्याही डावात यशस्वी जैसवालने शतकी खेळी केली. त्याने 372 चेंडू खेळून 181 धावा केल्या. तर अमन जाफरने 259 चेंडूत 127 धावांची शतकी खेळी केली.

याचबरोबर कर्णधार पृथ्वी शॉने 71 चेंडूत 64 धावांची आक्रमक खेळी केली. सुवेद पारकर 22 धावा करून बाद झाला. त्यानंतर सर्फरज खान (59) आणि शम्स मुल्लाणी (51) नाबाद अर्धशतकी खेळी करत धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. सामना ड्रॉ झाला असला तरी मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीवर रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबई विरूद्ध मध्यप्रदेश अंतिम सामना येत्या 22 जूनपासून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT