Musheer Khan  esakal
क्रीडा

IND U19 vs BAN U19 : सरफराज खानच्या भावाने भारताचा डाव सावरला; मुरगन अभिषेकने दिली साथ

अनिरुद्ध संकपाळ

IND U19 vs BAN U19 : 19 वर्षाखालील आशिया कपच्या सेमी फायनल सामन्यात बांगलादेशने भारताची अवस्था 6 बाद 61 धावा अशी केली होती. मात्र मुशीर खान आणि त्यानंतर मुरगन अभिषेक यांनी अर्धशतक ठोकत भारताचा डाव सावरला. भारताने 188 धावांपर्यंत मजल मारली.

मुशीरने 62 चेंडूत 50 धावा केल्या तर मुरगन अभिषेकने 73 चेंडूत 62 धावा केल्या. बांगलादेशकडून मारूफ मृधाने 41 धावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मारूफने भेदक मारा करत भारताची अवस्था 6 बाद 61 धावा अशी केली होती. टॉप ऑर्डरमध्ये प्रियांशू मोलिया (19) आणि सचिन दास (16) यांनाच दुहेरी आकडा पार करता आला.

भारताचे सहा फलंदाज कसंबसं संघाचं अर्धशतक पूर्ण करून बाद झाल्यानंतर मुशीर खान आणि मुरगमन अभिषेक यांनी भारताचा डाव सावरला. रणजी ट्रॉफीचे अनेक हंगाम गाजवणाऱ्या सरफराज खानचा छोटा भाऊ असलेल्या मुशीरने भावाप्रमाणेच दमदार फलंदाजी केली.

त्याने 52 धावा करत अभिषेकसोबत सातव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचली. मुशीर बाद झाल्यानंतर अभिषेकने तळातील फलंदाज राज लिंबानीसोबत भारताला 170 धावांचा टप्पा पार करून दिला. राज लिंबानीनेही नाबाद 11 धावा करत भारताला 188 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT