Tennis sakal
क्रीडा

Tennis : नदालची फ्रेंच ओपनमधून माघार

२०२४ हे कारकिर्दीतील शेवटचे वर्ष

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस - अखेर राफेल नदाल याने फ्रेंच ओपन या ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेमधून माघार घेतली. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅममध्ये नदालला दुखापत झाली होती. त्यामधून तो अद्याप बरा झालेला नाही. याच कारणामुळे नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. सोशल माध्यमाद्वारे त्याने याबाबत माहिती दिली.

तसेच २०२४ हे वर्ष त्याच्या टेनिस कारकिर्दीतील अखेरच वर्ष असणार आहे, असेही त्याच्याकडून सांगण्यात आले. नदाल याने सर्वाधिक १४ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. नदाल याप्रसंगी म्हणाला, माझ्या दुखापतीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. माझ्या शरीराची तंदुरुस्ती बघून मी निर्णय घेत आहे.

सध्या तरी टेनिस कोर्टवर पुनरागमन करू शकत नाही. तंदुरुस्ती मिळवण्यानंतर पुनरागमन करीन. आता डेव्हिस करंडकात सहभागी होण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच २०२४ हे माझ्या कारकिर्दीतील अखेरचे वर्ष असेल, असे नदालने पुढे सांगितले. नदालच्या अनुपस्थितीमुळे आता फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकण्यासाठी टेनिसपटूंमध्ये रस्सीखेच होईल, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT