Naked Man Invades Turf And Disrupts sakal
क्रीडा

Video : पाक-न्यूझीलंड सामन्यात मैदानात घुसला नग्न व्यक्ती अन्...

पाकिस्तानने बाबर आझमच्या बेटिंग दरम्यान एक नग्न व्यक्ती मैदानात घुसल्याची धक्कादायक घटना पाहायला मिळाली.

Kiran Mahanavar

New Zealand vs Pakistan : न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात टी-20 विश्वचषकापूर्वी त्रिकोणी टी-20 मालिका खेळल्या जात आहे. शनिवारी क्राइस्टचर्चमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 सामना खेळला गेला. बाबर आझमने न्यूझीलंडचा सहा विकेट्सने पराभव केला. या सामन्यादरम्यान एक नग्न व्यक्ती मैदानात घुसल्याची धक्कादायक घटना पाहायला मिळाली.

ही घटना घडली त्यावेळी पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती आणि कर्णधार बाबर आझम खेळत होता. नग्न माणूस मैदानात शिरला मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला कसेबसे नियंत्रणात ठेवले. या संपूर्ण घटनेमुळे सामना काही काळ ठप्प झाला होता. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून योग्य वेळी पुढील कारवाई केली जाईल. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यादरम्यान एक नग्न माणूस खेळपट्टीवर आला होता

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 8 बाद 147 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने 35 चेंडूत 36, तर कर्णधार केन विल्यमसनने 30 चेंडूत 31 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 18.2 षटकांत 148 धावांचे लक्ष्य गाठले. कर्णधार बाबर आझमने 53 चेंडूंत 11 चौकारांसह 79 धावांची नाबाद खेळी खेळली. शादाब खानने 22 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा करत कर्णधाराला चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ब्लेअर टिकनरने दोन, तर ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT