sakal
क्रीडा

T20 World Cup : आफ्रिकेतील 'या' संघाला मिळाला अमेरिकेचा व्हिसा! टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी ठरला पात्र

Kiran Mahanavar

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप पुढील 6 महिन्यांनंतर जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला जाणार आहे. ही स्पर्धा खूप खास असणार आहे. कारण यावेळी 20 संघ टी-20 वर्ल्ड कप खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेसाठी आतापर्यंत 19 संघ पात्र ठरले आहेत. आता वर्ल्ड कपसाठी नामिबिया संघ पात्र ठरला आहे.

आफ्रिका क्वालिफायरमधून पात्र ठरणारा नामिबिया हा पहिला संघ ठरला. नामिबियाच्या संघाने 5 पैकी 5 सामने जिंकून 2024 टी-20 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. नामिबियाच्या पात्रतेसह टी-20 वर्ल्ड कपसाठी एकूण 19 संघाच्या जागा निश्चित झाल्या आहेत. आता फक्त एक जागा रिक्त आहे. उर्वरित जागा झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा येथून प्रत्येकी एकाने भरणे अपेक्षित आहे.

रिचर्ड इरास्मसच्या नेतृत्वाखाली नामिबियाने पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात टांझानियाचा 58 धावांनी पराभव करून टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये प्रवेश केला. संपूर्ण क्वालिफायरमध्ये नामिबिया चांगलाच फॉर्ममध्ये दिसत होता.

  • पहिला सामना- नामिबियाने झिम्बाब्वेचा ७ गडी राखून पराभव केला.

  • दुसरा सामना- नामिबियाने युगांडाचा 6 गडी राखून पराभव केला.

  • तिसरा सामना- नामिबियाने रवांडाचा 68 धावांनी पराभव केला.

  • चौथा सामना- नामिबियाने केनियाचा 6 गडी राखून पराभव केला.

  • पाचवा सामना- नामिबियाने टांझानियाचा 58 धावांनी पराभव केला.

वर्ल्ड कपसाठी हे संघ ठरले पात्र...!

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान आणि नामिबिया या संघांनी आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी पात्र झाले आहेत.

यावेळी स्पर्धेच्या सुरुवातीला, प्रत्येकी पाच संघांचे चार गट पहिल्या फेरीत एकमेकांसमोर येतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 मध्ये जातील, तेथून पुन्हा सुपर 8 च्या शेवटी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Atpadi news : शिवसेनेचे तृतीयपंथी पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू, सांगलीच्या आटपाडीमधील घटना

Thane News: ठाण्यातील वनजमिनीवरील पाच दशकांचा शासनाचा दावा फेटाळला, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

अमिताभ नाहीतर 'या' व्यक्तीवर होतं जया बच्चन यांचं पहिलं प्रेम, म्हणालेल्या...'ते मला देवासारखे वाटतात'

Pune Dust Pollution: पुणे पिंपरीत डंपर मिक्सरचा ‘धूळकंठ’; अवजड वाहनांमुळे वायू, धूळ आणि ध्वनी प्रदूषण वाढले

SCROLL FOR NEXT