Pakistan ICC World Cup 2023 sakal
क्रीडा

Asia Cup : 'नसीम शाह वर्ल्ड कपमधून बाहेर...', कर्णधार बाबर आझमच्या वक्तव्याने अख्ख्या पाकिस्तानला बसला शॉक

Kiran Mahanavar

Pakistan ICC World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या आधी पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज नसीम शाह वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नसीमबाबत कर्णधार बाबर आझमने प्रतिक्रिया दिली आहे. नसीम सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडू शकतो, असे संकेत त्याने दिले आहेत. आशिया कप 2023 च्या सामन्यादरम्यान नसीमच्या खांद्याला दुखापत झाली होती.

बाबर आझमने हरिस रौफ आणि नसीम यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार बाबर म्हणाले की, मी यावर नंतर बोलेन. प्लॅन बी वर आत्ताच काही सांगू शकत नाही. पण हो हरिस रौफ ठीक आहे. त्याची दुखापत किरकोळ आहे. वर्ल्ड कपपूर्वी तो बरा होईल. नसीम शाहही सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. मला अद्याप पुनर्प्राप्तीबद्दल माहिती नाही. मी फक्त माझे मत व्यक्त करत आहे.

नसीम सध्या दुबईत आहे. येथे त्यांच्यावर स्कॅन केले जाईल. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान नसीमच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. चालू सामन्यातून नसीम मैदानाबाहेर गेला. यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला.

वर्ल्ड कप 2023 पाच ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे, जो 6 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT