National Games 2022 Radhika Awati won gold in Fencing sport sangli sakal
क्रीडा

National Games 2022 : सांगलीकर राधिका आवटीने तलवारबाजीत पटकावले सुवर्ण

गुजरातमधील राष्ट्रीय स्पर्धेत केरळकडून सहभाग

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

सांगली : जन्म कोल्हापूर जिल्ह्यात अन् राहायला सांगलीत असलेल्या राधिका प्रकाश आवटी हिने गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केरळकडून खेळताना तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेतील हे सलग चौथे सुवर्णपदक ठरले आहे. मूळ अकिवाट (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील प्रकाश आणि रेखा या शेतकरी दाम्पत्याची राधिका ही कन्या. मुलांच्या शिक्षणासाठी सांगलीते आलेले आवटी कुटुंब नळभागात राहते. राधिका सहावीपर्यंत कुपवाडच्या नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये शिकत होती.

शाळेत प्रात्यक्षिक पाहिले

सांगलीत राधिकाने नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये शिकत असताना तलवारबाजीचे प्रात्यक्षिक पाहिले आणि ती या खेळाकडे ओढली गेली. तलवारबाजीच शिकायची असा निर्णय तिने शाळेत असताना घेतला तिच्या निर्णयाला वडील प्रकाश आणि आई रेखा यांनी पाठिंबा दिला. राधिकाचे प्रशिक्षक सागर लागू हे केरळमध्ये थॅलेसर येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रात गेले. त्यांनी या केंद्राची माहिती राधिकाला दिली.

थॅलेसरच्या केंद्रात दाखल

देशभरात तलवारबाजीचे प्रशिक्षण देणाऱ्या मोजक्याच संस्था आहेत. यामध्ये थॅलेसरच्या केंद्राचा समावेश होतो. या केंद्राची माहिती मिळाल्यानंतर राधिका आपल्या वडिलांसह या केंद्राच्या निवड चाचणीसाठी गेली. तिची निवड झाल्यानंतर तेथेच राहण्याचा तिने निर्णय घेतला. साईचे प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तेथे सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या, परंतु पहिले जवळपास सहा महिने राधिकाची परीक्षा घेणारे ठरले. नवीन प्रांत नवी भाषा आणि हवामान याच्याशी तिला जुळवून घेणे अवघड होत होते. केरळची मल्याळम भाषा समजत नसल्याने तिला बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र त्यावर मात करत तेथेच ती जिद्दीने राहिली आणि तिने तलवारबाजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तलवारबाजीत कौशल्य प्राप्त केल्याने तिला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांची दारे खुली झाली. २०११ व २०१५ च्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सांघिक रौप्यपदक पटकावले होते.

तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाची ती सदस्य होती. याबरोबरच वरिष्ठ आशियाई आणि वरिष्ठ जागतिक स्पर्धेतही तिने चमक दाखवली. आजवर सुमारे ४० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भाग घेतला आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत सलग चौथ्यांदा सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम तिने गांधीनगर येथे केला. नववीत असल्यापासून केरळमध्ये राहत असल्याने राधिका आता केरळची रहिवासी असून ती केरळ राज्याकडूनच स्पर्धेत उतरते. त्यामुळेच सध्या गांधीनगर येथे सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने केरळकडून खेळताना तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावले. राधिकाचे तलवारबाजीतील यश पाहून तिला केरळ सरकारने क्रीडा व युवक कल्याण विभागात सेवेत घेतले आहे.

आमचे शेतकरी कुटुंब. क्रीडा क्षेत्राचा कोणताही वारसा नसताना राधिकाने मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. राधिकाची इच्छा लक्षात घेऊन तिला आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिले खेळासाठी काही कमी पडू दिले नाही. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी इटली सारख्या ठिकाणी जाऊन सराव करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.

- अभिषेक आवटी, (राधिकाचा भाऊ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT