National Games 2022 vaibhav srirame gold medalist in traditional yogasana category 
क्रीडा

National Games 2022 : वैभवचा दुहेरी सुवर्ण धमाका

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला योगासनात पाच पदके

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : नागपूरच्या राष्ट्रीय योगपटू वैभव श्रीरामे आणि छकुली सेलोकर यांनी सर्वोत्तम आणि चित्तथरारक आसन करून ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचा डबल धमाका उडवला. वैभवने योगासनाच्या आर्टिस्टिक वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. त्यापाठोपाठ नागपूरची छकुली महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरली. रत्नागिरीच्या पूर्वाने महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. यासह महाराष्ट्र संघाने यंदा नव्याने समावेश करण्यात आलेल्या योगासन खेळ प्रकारात दोन दिवसांत पाच पदकांची कमाई केली. यामध्ये वैभवच्या दोन सुवर्ण आणि छकुलीच्या दोन रौप्यपदकांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या पारंपरिक खेळ प्रकारात आपले वर्चस्व आबाधित ठेवता आले.

वैभव श्रीरामेने सोनेरी यशोमालिका कायम ठेवत शनिवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाने खाते उघडून दिले. त्याने पुरुषांच्या आर्टिस्टिक गटामध्ये अंतिम फेरी गाठली. या अंतिम फेरी मध्ये त्याने चित्तथरारक आणि लवचिकतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १३६.५२ गुणांची कामगिरी केली. यासह तो या गटामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने शुक्रवारी पारंपरिक आसन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.सलग दोन सुवर्णपदके जिंकल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. निश्चित केलेले लक्ष मला यशस्वीपणे गाठता आले. त्याचा मला मोठा आनंद झाला. असे वैभवने म्हंटले आहे.

छकुलीला दुसरे रौप्य

नागपूरच्या युवा योगपटू छकुलीने पदकाची आपली मोहीम कायम ठेवली आहे. महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये दुसऱ्या स्थानी धडक मारत; तिने या गटाच्या अंतिम फेरीत १२७.६८ गुण संपादन केले. त्यामुळे तिला रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले. तिने शुक्रवारी महिलांच्या पारंपरिक आसन प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.

पूर्वाने उघडले पदकाचे खाते

रत्नागिरी येथील युवा योगपटू पूर्वा किनारे हिने पदार्पणातच राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत पदकाचे खाते उघडले. तिने महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये कांस्यपदक जिंकले. तिने १२६.६८ गुणांची कमाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT