maharashtra vs chhattisgarh Sakal
क्रीडा

महाराष्ट्राचा विजयी धडाका; आता पुढचं लक्ष्य बिहार!

गोल सरासरीमध्ये महाराष्ट्र हॉकी संघ आघाडीवर

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी-चिंचवड : कर्णधाराला साजेसा खेळ करत तालेब शाहने (Taleb Shah) सलग दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra Hockey) विजयात मोलाची कामगिरी बजावली. पहिल्या सामन्यात आठ गोल करणाऱ्या तालेबनं सोमवारी झालेल्या छतीसगड विरुद्धच्या लढतीत 3 गोल डागले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र हॉकी संघाने 11 व्या वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत छत्तीसगड संघावर (Chhattisgarh Hockey) 9-2 असा विजय मिळवला. महाराष्ट्राचा स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला. महाराष्ट्राप्रमाणेच बिहार आणि उत्तर प्रदेश संघांनी देखील दुसऱ्या विजयाची नोंद करून बाद फेरीच्या दृष्टिने मोठे भक्कम पाऊल टाकले.

महाराष्ट्राच्या गटात असलेल्या बिहारने दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी मिझोरामचा 4-0 असा पराभव केला. सहा गुणांसह दोन्ही संघ या गटात आघाडीवर आहेत. या दोन्ही संघात गुरुवारी लढत होणार असून यातील विजेता संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल. गोल सरासरीमध्ये महाराष्ट्र हॉकी संघ आघाडी असून, त्यांची +25 तर बिहारची +6 अशी गोल सरासरी आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्रच सरस असल्याचे दिसते.

कर्णधार तालेब शाह महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार होता. त्याने 4 , 30 आणि 55 व्या मिनिटाला गोल केला. त्याला प्रताप शिंदे आणि मोहम्मद निजामुद्दिन यांनी प्रत्येकी 2 गोल करून सुरेख साथ दिली. या आक्रमक खेळाच्या नादात त्यांचे बचावाकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना दोन गोल स्वीकारावे लागले. महाराष्ट्रासाठी व्यंकटेश केंटे आणि टिकाराम ठकुला यांनी अन्य गोल केले. छत्तीसगडकडून कार्तिक यादव आणि जुनेद अहमद यांनी गोल डागले.

सी गटात सलग दुसरा विजय मिळविताना उत्तर प्रदेशाने झारखंडला 3-0 असे पराभूत केले. ओडिशाने एफ गटातील चुरशीच्या सामन्यात पश्चिम बंगालला बरोबरीत रोखले. आता या गटातून हे दोन्ही संघ 4 गुणांसह बरोबरीवर आहेत. त्यामुळे आता या दोघांमधील सामन्यालाही बाद फेरी गाठण्याच्या दृष्टिने महत्व येणार आहे.

स्पर्धेत तीन दिवस गोलची बरसात पाहायला मिळत असताना चौथ्या दिवसाची सुरुवात ही बरोबरीच्या लढतीनं झाली. पूर्वार्धात 3-0 पिछाडीवर राहिलेल्या बंगालने उत्तरार्धात आपला खेळ उंचावून जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी तीन गोल करून सामना बरोबरीत सोडवला. एफ गटातील अन्य एका सामन्यात वेगवान खेळाची अनुभूती आली. गुजरातने मध्यंतराच्या 3-1 अशा आघाडीनंतर गोव्याचा 4-3 असा पराभव केला. जी गटातील सामन्यात उत्तर प्रदेश संधाने वर्चस्व राखत झारखंडला 3-0 असे पराभूत केले. फराझ मोहम्मदने चौथ्याच मिनिटाला कॉर्नवर गोल केल्यावर अजयने पूर्वार्ध आणि उत्तर्रार्धात 1-1 गोल करत उत्तर प्रदेशाचा विजय साकारला. याच गटात केरळाने आसामविरुद्ध 2-2 अशी मात दिली.

तमिळनाडूचा मोठा विजय

अ गटातील सामन्यात तमिळनाडूने तेलंगणावर 7-0 असा विजय मिळविला. आजच्या दिवसातील हा सर्वात मोटा विजय ठरला. तमिळनाडूच्या विजयात कार्तिने 3 गोल करून विजयात महत्वाची भूमिका बजावली. सुंदरापंडी, मारीस्वरन, सिल्वर स्टॅलिन यांनीही गोल करून संघाच्या विजयात आपला वाटा उचलला. तमिळनाडूचा हा स्पर्धेतील पहिला विजय होता. आता बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना अखेरच्या सामन्यात हिमाचल प्रदेशाविरुद्ध असाच खेळ करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT