Tushar More sakal
क्रीडा

Tushar More : राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलीबॉल खेळाडूचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलीबॉल खेळाडू तुषार अरुण मोरे (वय ३४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी - डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलीबॉल खेळाडू तुषार अरुण मोरे (वय ३४) यांचे आज (ता.६) रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने डोर्लेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तुषार मोरे यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. येथील प्रसिद्ध असणाऱ्या सेव्हन स्टार कबड्डी संघात त्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर अनेक ठिकाणी सहभागी घेऊन वजनी व खुल्या गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. तसेच न्यू गोल्डन हॉलीबॉल या संघात देखील त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.

मागील ३० डिसेंबर रोजी दुबई येथील अबुधाबी येथे झालेल्या देश पातळीवरील हौशी हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघात तुषार मोरे व सागर काळकुटे या डोर्लेवाडी येथील दोन खेळाडूंची निवड झाली होती. त्या ठिकाणी भारतीय संघाने प्रथम पारितोषिक मिळवले होते.

महाराष्ट्रात संगमनेर, सोलापूर, जेजुरी, वैराग, येडशी, काटी, ओतूर, पणदरे, मुरूम, मुर्टी, अंथूर्णे, लासूर्णे, शारदानगर, माळेगाव या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सलग चौदा वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते यामध्ये तुषार मोरे यांनी सेंटर व साईड या दोन्ही ठिकाणी उत्तम खेळ करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.

आज सकाळी छातीत दुखू लागल्याने बारामती येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री त्यांच्यावर डोर्लेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक खेळाडूंनी उपस्थिती दाखवून हळहळ व्यक्त केली.

तुषार मोरे हा अत्यंत गुणवान खेळाडू होता त्याच्या अकाली जाण्याने कबड्डी व हॉलीबॉल क्षेत्रामध्ये कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. असा अष्टपैलू खेळाडू पुन्हा तयार होणे नाही अशी भावना जेष्ठ खेळाडू आनंदराव काळकुटे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

Viral Video: 'स्टॅन स्टॅन' बनून रिषभ पंतचा धमाका! न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबसाठी सिक्सचा पाऊस पाडत केलं अर्धशतक

Latest Marathi News Live Update: अशैक्षणिक कामे थांबवा, शिक्षकांना त्यांचे मूळ काम करू द्या!

Pune Crime : रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणाचा खून; आठ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT