National Sport  esakal
क्रीडा

National Sport : भारताचा हरमनप्रीत सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू पुरस्कार पटकवणारा चौथा खेळाडू

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगच्या शिरपेचात शुक्रवारी मानाचा तुरा खोवला गेला. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून २०२१-२२ या सालातील सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून हरमनप्रीत याची निवड करण्यात आली. त्याने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावला. सलग दोन वेळा सर्वोत्तम हॉकीपटू ठरणारा तो चौथाच खेळाडू होय. हरमनप्रीत हा भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार आहे. त्याने प्रो हॉकी लीगमधील २०२१-२२ मोसमात १६ लढतींमध्ये १८ गोल केले हे विशेष. यामध्ये दोन हॅट्ट्रिकचा समावेश होता.

आशियाई चॅम्पियन्स करंडकातही त्याने आपला ठसा उमटवला. या स्पर्धेतील सहा लढतींमध्ये त्याने ८ गोल केले. भारतीय संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले. या देदीप्यमान यशातही त्याने मोलाची भूमिका बजावली. हरमनप्रीतने २९.४ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. नेदरलँडच्या थिअरी ब्रिंकमन याला २३.६ गुणांची कमाई करता आली. तसेच बेल्जियमच्या टॉम बून याने २३.४ गुणांची कमाई केली. ब्रिंकमन दुसऱ्या आणि बून तिसऱ्या स्थानावर राहिला.

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून हरमनप्रीतचा गौरव करण्यात आला. यामध्ये त्याच्याबाबत सांगण्यात आले की, हरमनप्रीत हा सध्याच्या युगातील सुपरस्टार हॉकीपटू आहे. तो एक अव्वल दर्जाचा बचावपटू आहे. प्रतिस्पर्ध्याला गोल करण्यापासून तो अगदी सहज रोखतो. त्याच्याकडे ड्रिबलींगची गुणवत्ता आहे. त्यामुळे तो भारतासाठी गोलदेखील करतो, अशा शब्दांत त्याच्या खेळाची स्तुती करण्यात आली.

महिला गटात नेदरलँडची फेलिस अव्वल महिला गटात वर्षभरातील सर्वोत्तम हॉकीपटूचा मान नेदरलँडच्या फेलिस ॲलबर्स हिला मिळाला. हा पुरस्कार पटकावणारी ती १९९९ नंतरची सर्वात युवा हॉकीपटू ठरली आहे. तिला २९.१ गुण मिळाले. मारिया ग्रॅनॅटो हिला २६.९ गुणांसह दुसऱ्या आणि अगस्तीना गोर्झेलॅनी हिने १६.४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT