National Sport news
National Sport news esakal
क्रीडा

National Sport : जलतरण,ज्युदोमध्ये महाराष्ट्राला पदक

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : महाराष्ट्राच्या खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी शुक्रवारीही कायम राहिली. ज्युडो व जलतरण या खेळांमध्ये पदके जिंकण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना यश लाभले.

महाराष्ट्राच्या ज्युदोपटूंनी पदकांचे खाते उघडले. अपूर्वा महेश पाटील हिने ७८ किलोपेक्षा अधिक वजन गटात ब्राँझपदक पटकावले. अपूर्वा हिने पहिल्या लढतीत मणिपूरच्या रोशनी देवीला पराभूत केले. दुसऱ्या लढतीत अपूर्वाने तमिळनाडूच्या देवधर शनीला हरवत आगेकूच केली. उपांत्य सामन्यात अपूर्वाला पंजाबच्या मनप्रीतकडून पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अपूर्वा ही ब्राँझपदकाची लढत खेळली. त्यात अपूर्वा हिने मणिपूरच्या उमा चौहानला नमवून ब्राँझपदक जिंकले.

जलतरणात रुपेरी यश

महाराष्ट्र संघाने जलतरणातील चार बाय शंभर मीटर्स मिश्र फ्री स्टाईल शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. या संघात वेदांत माधवन, अवंतिका चव्हाण, दिवा पंजाबी व हीर शहा यांचा समावेश होता. या संघाने हे अंतर तीन मिनिटे ४७.८१ सेकंदात पार केले. उत्कंठापूर्ण झालेल्या शर्यतीत कर्नाटकने सुवर्णपदक मिळवताना ही शर्यत तीन मिनिटे ४४.६२ पूर्ण केली. तसेच तमिळनाडू संघाने हे अंतर तीन मिनिटे ५०.७४ सेकंदात पार करीत ब्राँझपदक पटकाविले.

हॉकीत झारखंडचे आव्हान

सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आतापर्यंत अपराजित असलेल्या महाराष्ट्र संघाला पुरुषांच्या हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीत झारखंड संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना येथे शनिवारी होणार असून तो जिंकण्यासाठीच महाराष्ट्र संघ उतरणार आहे. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू असून आत्तापर्यंत झालेल्या साखळी गटातील सर्व सामने महाराष्ट्राने जिंकले आहेत.

मुष्टियुद्धमध्ये आर्या, हरिवंश पराभूत

महाराष्ट्राच्या आर्या कुलकर्णी व हरिवंश तावरी या खेळाडूंना स्पर्धेतील आपापल्या वजनी गटात पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला. महात्मा मंदिर सांस्कृतिक सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या ५० ते ५२ किलो गटात मणिपूरच्या ओजीबाला थोनाजम या अनुभवी खेळाडूने आर्या हिला ५-० असे पराभूत केले. पुरुषांच्या ६० किलो गटात हरिवंश याच्यापुढे सेनादलाच्या हितेश कुमारचे आव्हान होते. हितेश हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड होते. तथापि हरिवंश याने सुरुवातीपासूनच त्याला कौतुकास्पद लढत दिली. ही लढत हितेश याने ५-० अशी जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT