Mayuri Lute Sakal
क्रीडा

National Sports Competition : महाराष्ट्राच्या मयुरी लुटे हिची पदकांची पंचमी

महाराष्ट्राच्या मयुरी लुटे हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दैदीप्यमान कामगिरी केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या मयुरी लुटे हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दैदीप्यमान कामगिरी केली. तिने या स्पर्धेमधील ट्रॅक सायकलिंगमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण पाच पदकांवर मोहोर उमटवली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या ट्रॅक सायकलिंगच्या महिलांच्या गटात मयुरीने पहिला क्रमांक पटकावला.

रौप्यपदकही महाराष्ट्राच्याच सुशिकला आगाशेने मिळवले. दिल्लीच्या त्रियंशा पॉलला हिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. ट्रॅक सायकलिंगमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्ण, तीन रौप्य, दोन ब्राँझ अशी एकूण आठ पदके प्राप्त केली.

महिला हॉकी संघाचा विजय

प्रियांका वानखेडेच्या दुहेरी गोलच्या जोरावर महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात कर्नाटकवर ३-१ असा शानदार विजय मिळवला; पण महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. या सामन्यात पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले; मग दुसऱ्या सत्रात २७व्या मिनिटाला प्रियांकाने महाराष्ट्राचा पहिला गोल साकारला.

पण पुढच्याच मिनिटाला कर्नाटकच्या निशा पी. सी. हिने (२८व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत मध्यंतराला १-१ अशी बरोबरी साधली. चौथ्या सत्रात मात्र महाराष्ट्राने आव्हान कायम ठेवण्यासाठी आक्रमक खेळ केला. ५३व्या मिनिटाला प्रियांकाने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत महाराष्ट्राची आघाडी २-१ अशी वाढवली. मग दोन मिनिटांनी लालरिंडिकीने (५५व्या मिनिटाला) मैदानी गोल करीत महाराष्ट्राच्या खात्यावर तिसरा गोल जमा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या भावना खाडेला पिवळे कार्ड दाखवण्यात आले.

ब-गटातून झारखंड (१० गुण) आणि पंजाब (७ गुण) यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. महाराष्ट्रानेही ७ गुण कमावले. पण गोलफरकामध्ये पंजाबने आगेकूच केली.

रुचिरा, साक्षी अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

रुचिरा विणेरकर आणि साक्षी सूर्यवंशी या महाराष्ट्राच्या दोन नेमबाज चार गुणांच्या फरकाने महिला १० मीटर एअर रायफल प्रकाराची अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरल्या. रुचिराने पाच मालिकांमध्ये अनुक्रमे ९६, ९१, ९३, ९७, ९६, ९५ असे एकूण ५६८ गुण मिळवले. साक्षीने ९१, ९४, ९६, ९६, ९५ असे एकूण ५६८ गुण प्राप्त केले.

मानसीची सुवर्णपदकाला गवसणी

कधीही हार मानू नये, ही वृत्ती ठेवली, तर यश निश्चितपणे मिळते, असे आपण नेहमी म्हणत असतो. याचाच प्रत्यय घडवत महाराष्ट्राच्या मानसी मोहितेने ट्रायथलॉनमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. याचप्रमाणे संजना जोशीने रौप्यपदक जिंकले. ट्रायथलॉनमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने दोन पदके पटकावली.

ट्रायथलॉनमध्ये पोहताना जेली फिशने तिच्या पायाच्या चावा घेतला. मात्र तरीही तिने पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तिन्ही शर्यती यशस्वीपणे पूर्ण करीत महाराष्ट्राला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिली. या स्पर्धेत तिची सहकारी संजना जोशी ही रौप्यपदकाची मानकरी ठरली.

शेतकऱ्याच्या कन्येचे यश

नागपूरच्या भंडारा जिल्ह्यातील बेला गावची शेतकरी कन्या मयुरी लुटेने ट्रॅक सायकलिंगमध्ये पंचतारांकित यश मिळवून महाराष्ट्राच्या यशात सिंहाचा वाटा उचलला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाच पदके मिळवल्याचा मला आनंद झाला आहे, अशी भावना मयुरीने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT