Virat-Naveen Patch-up esakal
क्रीडा

Virat-Naveen Patch-up : विषय मिटवला! अखेर नवीनने आपल्या शेवटच्या स्पर्धेत 'विराट' मिठी मारलीच

अनिरुद्ध संकपाळ

Virat-Naveen Patch-up : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात सर्वाधिक चर्चा ही विराट कोहली आणि नवीन उल हक यांची होती. याला आयपीएलमधील वादाची देखील झालर होती. मात्र आजच्या सामन्यात या दोघांमध्ये दुश्मनी नाही तर दोस्ती पहावयास मिळाली.

नवीन उल हकने भारतात दाखल होण्यापूर्वीच आपली ही शेवटची वनडे स्पर्धा असल्याचे घोषित केले होते. तो वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्यापूर्वीच त्याने संधी मिळताच विराटसोबत आयपीएलमध्ये निर्माण झालेली दुश्मनी संपवून पॅचअप केले.

योगायोगाची गोष्ट म्हणजे यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर आणि नवीनसाठी विराटलाही भिडणारा गौतम गंभीर देखील होता. मात्र दोघांच पॅचअप पाहून गौतम गंभीरने देखील नमती भुमिका घेत.

भांडणं ही मैदानावर असतात मैदानाबाहेर नाही. खेळाडूचा स्तर कोणताही असो तो आपल्या इज्जतीसाठी संघासाठी लढत असतो. असे म्हणत या नव्या ब्रोमान्सचे वर्णन केले.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार शाहिदीने 80 धावांची झुंजार खेळी केली. तर अजमतुल्लाने 62 धावांची अर्धशतकी खेळी करत त्याला चांगली साथ दिली.

मात्र भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 4 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेत मोक्याच्या क्षणी शाहिदी आणि अजमतुल्लाची जोडी फोडली. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी देखील प्रत्येकी 1 विकेट घेतली.

अफगाणिस्तानचे 273 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने धडाकेबाज सुरूवात केली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 156 धावांची दणदणीत सलामी दिली. यात किशनचे 47 धावांचे योगदान होते तर रोहितने आक्रमक शतकी खेळी केली.

इशान बाद झाल्यावर रोहितने विराटसोबत भारताचा विजय निश्चित केला. अखेर इशानला बाद करणाऱ्या राशिदनेच रोहितचा देखील त्रिफळा उडवला. मात्र तोपर्यंत रोहितने 87 चेंडूत 131 धावा ठोकल्या होत्या. विराट कोहलीने देखील 56 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. अय्यरनेही 25 धावांचे योगदान देत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT