Neeraj Chopra World Athletics Championships  esakal
क्रीडा

Neeraj Chopra : एक ही मारा मगर सॉलिड मारा! नीरजची धमाकेदार कामगिरी, फायनल गाठलीच पॅरिस ऑलिम्पिकचही तिकीट केलं निश्चित

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये आज भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिल्या भालाफेकीतच 88.77 मीटर अंतर पार केले. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच तो पहिल्या प्रयत्नातच फायलनसाठी पात्र झाला आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील तो पात्र झाला. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 85.50 मीटर भालाफेक करणे गरजेचे होते.

नीरजबरोबरच भारताचा किशोर जेनाने देखील ग्रुप B मध्ये आपली दावेदारी ठोकणार आहे. त्याची वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ही 84. 38 मीटर आहे. फायनल गाठण्यासाठी 43 मीटर मार्क सेट करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला देखील फायनल गाठण्याची संधी आहे.

ग्रुप A मधील डीपी मनूने देखील 81.31 मीटर लांब भाला फेकून फायनलसाठीची आपली दावेदारी ठोकली. त्याची ही वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तो सध्या ग्रुप A मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

गेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियशिपमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. अँडरसन पीटर्सनने 90.54 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदकावर कब्जा केला होता. यावेळी मात्र पीटर्सन ग्रुप A मध्ये सातव्या स्थानावर राहिला आहे. यावेळी अँडरसन बरोबरच पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे देखील कडवे आव्हान असणार आहे. तो ग्रुप B मध्ये असून त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत 90.13 मीटर लांब भाला फेकला होता.

भारताला आतापर्यंत वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीत कांस्य पदक पटकावले. त्यानंतर 19 वर्षांनी नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT