Neeraj Chopra Vs Arshad Nadeem World Athletics Championships  esakal
क्रीडा

Neeraj Vs Nadeem : भालाफेकीत भारत - पाकिस्तान फायनल रंगणार; 'सुवर्ण'साठी तीन भारतीय तर एक पाकिस्तानी भिडणार

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra Vs Arshad Nadeem : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये आज भारताचा पुरूष भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा (88.77 मीटर), किशोर जेना (80.75 मीटर) आणि डीपी मनू (81.31) या तीनही भालाफेकपटूंनी फायनलमध्ये प्रवेश केला. (World Athletics Championships Men's Javelin Throw Final)

भारतासोबतच पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम (86.79 मीटर) याने देखील अंतिम फेरी गाठली. तो ग्रुप B मध्ये अव्वल राहिला तर भारताचा नीरज चोप्रा हा ग्रुप A मध्ये अव्वल स्थानावर राहिला. अंतिम 12 च्या यादीत देखील नीरजच अव्वल स्थानावर राहिला.

त्यामुळे आता सुवर्ण पदकासाठी भारत आणि पाकिस्तान असा सामना रंगण्याची शक्यता आहे. पुरूष भालाफेकचा अंतिम सामना हा 27 ऑगस्टला रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल. ( India Vs Pakistan)

नीरज चोप्राची 88.77 मीटर ही हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच तो पहिल्या प्रयत्नातच जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद पुरूष भालाफेकीच्या फायलनसाठी पात्र झाला. याबरोबर तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील पात्र झाला. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 85.50 मीटर भालाफेक करणे गरजेचे होते. पाकिस्तानचा नदीम देखील 86.79 मीटर भाला फेकत पॅरिस ऑलम्पिकसाठी पात्र झाला आहे. याचा अर्थ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील भारत - पाकिस्तान द्वंद्व रंगणार हे नक्की.

ग्रुप A नंतर ग्रुप B ची पात्रता फेरी पार पडली. या पात्रता फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.79 मीटर लांब भालाफेक करत यादीत पहिले स्थान पटकवले. तो आणि वडेलिच देखील अंतिम फेरीसाठी थेट पात्र झाले. वडेलिचने 83.50 मीटर लांब भाला फेकला.

या ग्रुपमधील भारताचा भालाफेकपटून किशोर जेनाने 80.75 मीटर लांब भाला फेकला. तो फायनलसाठीच्या अंतिम 12 खेळाडूंच्या यादीत नवव्या स्थानवर राहिला. तर ग्रुप A मधील भारतीय खेळाडू डीपी मनूने 81.31 मीटर भाला फेक करत फायनलच्या 12 जणांच्या यादीत सहावे स्थान पटकावले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT