Neeraj Chopra Sakal media
क्रीडा

Cheating in Asian Games : चीनचा 'रडीचा डाव', नीरज चोप्रासोबत केली चिटींग; पहिल्या थ्रोला नेमकं काय घडलं?

नीरज चोप्राने भालाफेकीच्या पहिल्या प्रयत्नात केलेला थ्रो ग्राह्य धरण्यात आला नाही.

Manoj Bhalerao

Neeraj Chopra Javelin Throw: सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू आपला जोर दाखवत आहेत. चीनच्या हँगझाऊ शहरात या स्पर्धा पार पडत आहेत. बुधवारी (४ ऑक्टोबर) नीरज चोप्राने पुन्हा भालाफेकीत आपली कमाल दाखवली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये चीनची कुरापतखोरी आणि खोडसाळपणा पुन्हा दिसला.

नीरज चोप्रा जेव्हा आपल्या भालाफेकीचा पहिला प्रयत्न करण्यासाठी उतरला तेव्हा त्याच्यावर अन्याय झाल्याचं बघायला मिळालं. त्याने आपल्या पहिल्या प्रयत्नात जवळपास ८७ मीटरचा थ्रो केला. मात्र,त्यानंतर पंचांनी थोडा वेळ घेतला.

त्यानंतर असं सांगण्यात आलं की, तांत्रिक अडचणीमुळे त्याचा हा थ्रो मोजला जाऊ शकला नाही. मात्र, मार्किंग लाईनवरुन स्पष्ट दिसत होतं ही, त्याचा थ्रो ८५ मीटरपेक्षा जास्त अंतरावर गेला आहे. त्यानंतर त्याला पहिला थ्रो पुन्हा फेकायला लावला. त्याने या थ्रोमध्ये ८४ मीटरचं गाठलं. भालाफेकीचा इवेंट सुरु होण्याआधी देखील पंचांकडून दिरंगाई करण्यात आली होती.

भालाफेकीच्या या इवेंटमध्ये भारताचा दुसरा खेळाडू जेना किशोर कुमार याने देखील सहभाग घेतला आहे. त्याने देखील आपल्या पहिल्या फेकीत ८१.२६ मीटरचा थ्रो केला होता. त्यामुळे भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT