Federation Cup Athletics  sakal
क्रीडा

Federation Cup Athletics : नीरज चोप्रा, किशोर जेना थेट अंतिम फेरीत ; फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स

ऑलिंपिक व जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने आपल्या कारकिर्दीत कित्येक वेळा ७५ मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकला. त्याचप्रमाणे जागतिक स्पर्धेत पाचवे स्थान मिळविणाऱ्या किशोर जेनानेही ७५ मीटर अंतर बऱ्याच वेळा पार केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्वर : ऑलिंपिक व जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने आपल्या कारकिर्दीत कित्येक वेळा ७५ मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकला. त्याचप्रमाणे जागतिक स्पर्धेत पाचवे स्थान मिळविणाऱ्या किशोर जेनानेही ७५ मीटर अंतर बऱ्याच वेळा पार केले आहे. त्यामुळेच या दोघांसह नऊ जणांना कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या फेडरेशन करंडक स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भालाफेकीची अंतिम फेरी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे, १५ तारखेला रात्री सात वाजता सुरू होईल. या दोघांशिवाय पॅरिस ऑलिंपिकची पात्रता गाठण्याचा प्रयत्न करणारा कर्नाटकचा डी. पी. मनू यालाही थेट प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश निश्चित केलेल्या खेळाडूंपैकी नऊ जणांनी ७५ मीटरची पात्रता पार केली असल्याने त्यांना मंगळवारी सकाळी होणाऱ्या प्राथमिक फेरीत सहभागी न होता थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय ॲथलेटिक्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी दिली.

उर्वरित खेळाडूंना प्राथमिक फेरीत सहभागी व्हावे लागेल. यापैकी तीन अव्वल खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत भाग घेऊन नीरज सरळ फेडरेशन करंडक स्पर्धेत सहभागी होत आहे. यामुळे तो तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर मायदेशातील स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याच्यासह किशोर जेना उद्या भुवनेश्वरमध्ये दाखल होत आहे.

भारतीय संघ पोलंडमध्ये सराव करणार

आतापर्यंत भारताचे १९ ॲथलिट्‍स पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरले असून ऑलिंपिकपूर्वी हे खेळाडू पोलंडमधील स्पाला येथे चार आठवडे सराव करतील. तिथूनच हे खेळाडू पॅरिससाठी रवाना होतील, अशी माहिती नायर यांनी दिली. पॅरिसमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धांना एक ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. नुकत्याच बहामा येथे झालेल्या जागतिक रिले स्पर्धेतून भारताचे पुरुष व महिला ४-४०० मीटर रिले संघ पॅरिससाठी पात्र ठरले.

मात्र, मिश्र रिले संघाला अद्याप पात्रता मिळविता आलेली नाही. याबाबत नायर यांनी आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, दोन जागा शिल्लक असून जागतिक रँकिंगच्या माध्यमातून भारतीय संघ पात्र ठरेल. हा संघ २० व २१ मे रोजी बँकॉक येथे होणाऱ्या आशियाई रिले स्पर्धेत सहभागी होत असून जर भारतीय संघाने ३ मिनिटे १४ सेकंदांच्या आत शर्यत पूर्ण केली तर पॅरिसचे तिकीट पक्के होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

MD Drugs Crackdown: न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात संयुक्त धडक कारवाई; ११.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत तर एक फरार

Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

SCROLL FOR NEXT