Neeraj Chopra Mother  esakal
क्रीडा

Neeraj Chopra Mother : विषय पाकिस्तान, हरियाणा नाहीये... नीरज चोप्राच्या आईने दिलेल्या उत्तरानं सगळेच गपगार

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra Mother : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले वहिले सुवर्ण पदक जिंकून देत इतिहास रचला. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करता आली नव्हती.

नीरज चोप्रा हा जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदकं जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदक पटकावले. तर पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 87.82 मीटर लांब भालाफेक करत रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेकडे भारत - पाकिस्तान सामना असं पाहिलं गेलं. पत्रकारांनी देखील याच संदर्भाने नीरजच्या आई सरोज देवींना प्रश्न विचारला. मात्र सरोज देवी यांनी याचं भन्नाट उत्तर दिलं.

सरोज देवी या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, 'हे पाहा सर्वजण मैदानावर खेळण्यासाठी जातात. एक नाही तर दुसरा जिंकणारच असतो. त्यामुळे पाकिस्तान किंवा हरियाणा हा प्रश्नच नाही. हा विषय आनंदाचा आहे. जरी पाकिस्तानी जिंकला असता तरी त्यांच्यासाठीही तो आनंदाचाच क्षण असता.'

नीरज चोप्राने एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. त्याने ज्या स्पर्धा जिंकायला हव्या आहेत त्या सर्व जिंकल्या आहेत. त्याने ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला तेथे नीरज आणि अर्शद हे एकमेकांसमोर उभे होतेच. दोघेही अव्वल स्थानासाठी एकमेकांना भिडले. मात्र बऱ्याचवेळा नीरजने अव्वल स्थान पटकावले आहे.

नीरजने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, भालाफेकीत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत याचा आनंदच आहे. भालाफेकीत पारंपरिकरित्या युरोपियन देशांचं वर्चस्व राहिलं आहे.

नीरज चोप्रा म्हणाला होता, 'मला वाटतं की अर्शदीपने चांगल्या पद्धतीने भाला फेकला. भालाफेकीत दोन्ही देश कशी प्रगती करत आहेत याची चर्चा करत होतो. यापूर्वी युरोपियन खेळाडू सर्वोच्च स्थानावर होते. आता आम्ही सर्वोच्च स्थानावर आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee Setback : उद्धव ठाकरेंपेक्षाही ममता बॅनर्जींना धक्का!, ८० पैकी ५९ आमदार साथ सोडणार; बंगालचे एकनाथ शिंदे कोण?

Mumbai News: पूरमुक्त मुंबईसाठी महापालिका सज्ज! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर लक्ष

Team India Coach: भारतीय संघात नव्या कोचची एन्ट्री! कोण आहेत गौतम गंभीरच्या टीममध्ये सामील झालेले नवीन सदस्य?

व्वा, काय व्यवस्था आहे! तरुणपणी परीक्षा दिली, पण सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतर आलं नियुक्तीपत्र, लोकसेवा आयोगाचा गोंधळ

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

SCROLL FOR NEXT