neeraj chopra  Sakal
क्रीडा

गोल्डन बॉय नीरज चोप्राची 2022 Laureus Award साठी निवड

सुशांत जाधव

ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्डन कामगिरी करुन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नीरज चोप्राची Laureus World Breakthrough पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय ब्रिटीश टेनिस स्टार इमा राडूकानू (Emma Raducanu), टेनिस स्टार डॅनियल मेदवेदेव, Pedri, स्पॅनिश फुटबॉल स्टार पॅड्री (Pedri), युलिमार रोजास (Yulimar Rojas) आणि एरियार्न टिटमस (Ariarne Titmus.) या खेळाडूंचा समावेश आहे.

लॉरेन्स पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील जागतिक दर्जाचा सर्वोत्तम पुरस्कार आहेत. या पुरस्कारासाठी पात्र ठरणारा नीरज चोप्रा हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी 2019 मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि सचिन तेंडुलकर यांना नामांकन मिळवले होते. 2011 मध्ये भारतीय पुरुष संघाने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. या जेतेपदानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. भारतीय संघातील खेळाडूंनी तेंडुलकरला खांद्यावर उचलून मैदानावर फेरी मारली होती. हा क्षण 2000 चे 2020 या वीस वर्षांतील क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षण ठरला होता.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने 87.58 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक पटकावले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये गोल्डन कामगिरी करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT