Neeraj Chopra reaction after Padma shri award announcement  esakal
क्रीडा

Video: 'पद्मश्री' नीरज चोप्राची कॅलिफोर्नियावरून आली प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिकंणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) पद्मश्री पुरस्कार (Padma shri Award) जाहीर झाला. यापूर्वी त्याला परम विशेष सेवा मेडल देखील जाहीर झाले होते. यानंतर नीरज चोप्राने कॅलिफोर्नियावरून एक व्हिडिओ ट्विट करत सर्वांचे आभार मानले. नीरज चोप्राला ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (73rd Republic Day 2022) पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. (Neeraj Chopra reaction after Padma shri award announcement)

नीरज चोप्रा (Neeraj Chopra Training) सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या (California) चुला व्हिस्टा एलिट अ‍ॅथलीट ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव करत आहे. तो वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ साठी तयारी करत आहे. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा देखील होणार आहेत.

याच दरम्यान, नीरज चोप्राला पहिल्यांदा परम विशेष सेवा मेडल (Param Vashistha Seva Medal) जाहीर झाले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर झाला. त्यानंतर नीरजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचे आभार मानले.

नीरज आपल्या व्हिडिओत म्हणतो, मला परम विशेष सेवा मेडल (PVSM) आणि पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळाली. मी खूप आनंदी आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार. मी इथे सकाळच्या सराव सत्रासाठी आलो आहे. मी भरपूर मेहनत घेत आहे. मी माझ्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.' याचबरोबर नीरज चोप्राने इतर पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT