Neeraj Chopra  esakal
क्रीडा

Neeraj Chopra : डायमंड लीगमध्ये नीरज दुसऱ्या स्थानी, सुरूवात झाली होती खराब मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra : नीरज चोप्राने झुरीच डायमंड लीग पुरूष भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे. नीरज चोप्राची सुरूवात खराब झाली होती. त्याने पहिले दोन प्रयत्न हे फाऊल ठरले होते. त्यानंतर त्याने 80.79 मीटर लांब भाला फेकून सुरूवात केली.

मात्र त्याने चौथ्या प्रयत्नात नीराजने जोरदार पुनरागमन केलं. त्याने 85.22 मीटर लांब भाला फेकला. त्यानंतर त्याने पुन्हा फाऊल केला. मात्र सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 85.77 मीटर भाला फेकून अव्वल स्थानाच्या जवळ पोहचला होता. मात्र त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

चेक रिपब्लिकचा जेकब वडलेच हा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिला होता. त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्याने झुरीच डायमंड लीगमध्ये 88.86 मीटर लांब भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले. या यादीत 85.04 मीटर लांब भाला फेकणारा जुलियन वेबर हा तिसऱ्या स्थानावर राहिला.

दुसरीकडे भारताच्या मुरली श्रीशंकरने पुरूष लांब उडी स्पर्धेत पहिल्या प्रयत्नाच 7.99 मीटर लांब उडी मारून चांगली सुरूवात केली. तो पाचव्या स्थानावर राहिला. तो पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. तो डायमंड लीग फायनलसाठी पात्र झाला आहे.

यापूर्वी नीरज चोप्रा हा वर्ल्ड अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर त्याने वर्ल्ड अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याने अंतिम फेरीत 88.17 मीटर लांब भाला फेकला होता.

त्याला पाकिस्तानच्या अर्शद नदीमने चांगला टक्कर दिली होती. त्याने 87.82 मीटर लांब भालाफेक करत रौप्य पदक पटकावले. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नाच अव्वल स्थान पटकावले होते. नीरज चोप्राने एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असून त्याने डायमंड लीग टायटल देखील पटकावले आहे. नीरजने 20 वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PADALKAR VIRAL VIDEO: सलमानपेक्षा भारी पडळकरांचा कॉलर डान्स, कोण होती हिरोईन? तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

IND vs ENG 4th Test: अजिंक्य रहाणेची चौथ्या कसोटीपूर्वी गौतम गंभीरला एक विनंती! इंग्लंडला हरवण्यासाठी सांगितली रणनीती

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांच्या निशाण्यावर आता एकनाथ शिंदेंचा मंत्री; विधिमंडळात खडाजंगी, नेमकं काय घडलं?

Vidhan Bhavan: 'सभापती राम शिंदेचं कौतूक पहायला आई पोहोचली विधानभवनात'; इरकलचं लुगडं, डोक्यावर पदर...!

Medical Education: वैद्यकीय महाविद्यालयात गैरवैद्यकीय शिक्षकांचे प्रमाण वाढविण्यास एमएसएमटीएचा विरोध; शॉर्टकट उपाय नको

SCROLL FOR NEXT