Neeraj Chopra  esakal
क्रीडा

Neeraj Chopra : नीरजनं दुसऱ्या खेळाडूंचा विचार केला अन्... अन्याय झाला तरी दाखवली खिलाडूवृत्ती!

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra Asian Games 2023 Controversy : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आपली गोल्डन कामगिरी एशियन गेम्समध्ये देखील कामय ठेवली. त्याने पुरूष भालाफेकीत 88.88 मीटर लांब भालाफेक करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे भारताच्याच किशोर कुमार जेनाने रौप्य पदक पटकावले. त्याने 87.54 मीटर लांब भाला फेकला.

भारतीय भालाफेकपटूंनी चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये आपला डंका वाजवला असला तरी पंचांच्या निर्णयाचा फटका त्यांनाही बसला. नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात जवळपास 87 मीटर लांब भाला फेकला होता. मात्र पंचांनी तांत्रिक कारण देत तो अवैध ठरवला.

मात्र नीरजने याबाबत पंचांशी फार हुज्जत न घालता इतर खेळाडूंचा विचार केला. पदक जिंकल्यानंतर नीरजने याबाबत वक्तव्य केलं. तो म्हणाला, 'काहीतरी गडबड झाली. त्यांनी माझा पहिला थ्रो मोजलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या खेळाडूंने थ्रो केला अन् माझा मार्क गेला.'

नीरज पुढे म्हणाला की, 'इथं अशा घटना इतर खेळाडूंबाबत देखील घडल्या आहेत. ही चांगली गोष्ट नाही. जेनाचा दुसरा थ्रो देखील चुकीच्या पद्धतीने फाऊल ठरवला गेला. मात्र मी विचार केला की याबाबत जास्त वाद घालून काही फायदा होणार नाही. आम्हाला इतर खेळाडूंचा देखील आदर करावा लागेल. उशीर झाला तर त्यांची बॉडी थंड होण्यास सुरुवात झाली असती.'

नीरज चोप्राने आपली हंगामातील 88.88 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर किशोर कुमार जेनाने देखील आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी (87.54 मीटर) करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT