Neeraj Chopra wins gold at Kuortane Games too with a throw of 86.69 m
Neeraj Chopra wins gold at Kuortane Games too with a throw of 86.69 m  esakal
क्रीडा

नीरज चोप्रा पुन्हा चमकला, कुओर्तने गेम्समध्ये जिंकलं सुवर्ण

रोहित कणसे

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने कुओर्तने गेम्समध्ये ८६.६९ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. नीरजने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट आणि ग्रॅनडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स यांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. (Neeraj Chopra wins gold at Kuortane Games too with a throw of 86.69 m)

नुकताच नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या चोप्राने ८६.६९ मीटर फेक करून दमदार सुरुवात केली, जी तिच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी पुरेशी होती. वॉलकॉटने ८६.६४ मीटर थ्रोसह रौप्य आणि पीटर्सने ८४.७५ मीटर थ्रोसह कांस्यपदक मिळवले.

टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही दुसरीच स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. या आठवड्याच्या सुरुवातीला, त्याने पावो नुर्मी गेम्समध्ये ८९.३० मीटर थ्रो करून रौप्य पदक जिंकले आणि त्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज आता ३० जून रोजी डायमंड लीगच्या स्टॉकहोम लीगमध्ये भाग घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT