Neeraj Chopra Virender Sehwag esakal
क्रीडा

Neeraj Chopra : फेंको तो ऐसा फेकों की... सेहवागने नीरजचे कौतुक करताना कोणाला मारला टोमणा?

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra Virender Sehwag : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद पुरूष भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. 25 वर्षाच्या नीरज चोप्राने 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अंजिक्यपद स्पर्धेत भारताचे हे पहिलेच सुवर्ण पदक आहे. नीरजने मोठा इतिहास रचला. यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. (Virender Sehwag Tweet After Neeraj Chopra Won Gold)

भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी नीरजला या ऐतिहासिक कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र यात अभिनंदनाचं सर्वात लक्षवेधी ट्विट विरेंद्र सेहवागने केले. त्याचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

ट्विटरवर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग लिहितो की, 'फेका तर असं फेका की चार लोकं म्हणाली पाहिजेत की काय फेकतोय यार! 88.17 मीटर भाला फेकला. जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्ण पदक जिंकले. धमाकेदार कामगिरी सूरूच!'

विरेंद्र सेहवाग सोबतच गौतम गंभीरने देखील नीरजचे ट्विट करून अभिनंदन केले. तो म्हणाला, 'आमच्या हिऱ्याला सुवर्ण पदक मिळाले.'

नीरज चोप्राने अंतिम फेरीत 88.17 मीटर लांब भाला फेकला. त्याने पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला मागे टाकत सुवर्ण पदक पटकावले. नदीमने अंतिम फेरीत 87.73 मीटर लांब भाला फेकला होता. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाले फेकून आपले फायनलमधील स्थान आणि पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट देखील नक्की केलं होतं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT