क्रीडा

Neeraj Chopra : नीरजने भाला फेकल्याचा तो ऐतिहासिक क्षण अन् कुटुंबियांचा जल्लोष | Video Viral

सकाळ डिजिटल टीम

World Athletics Championships 2023 : भारतीय गोल्डन बॉय नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या यशानंतर कुटुंबियांना जल्लोष केला आहे. गावकऱ्यांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या जल्लोषाचा व्हिडिओ समोर आला आहे.

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अॅथलेटिक्स सेंटरमध्ये मध्यरात्री हा सामना सुरू झाला होता. त्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू नीरजने 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. अंतिम फेरीत एकूण सहा प्रयत्न झाले असून नीरजने दुसऱ्या फेरीपासून गुणतालिकेत आघाडी कायम ठेवली होती.

हा सामना पाहण्यासाठी नीरज चोप्रा याच्या घरी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. नीरजने तो ऐतिहासिक भाला फेकल्यानंतर कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी जल्लोष केला. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीरजच्या यशानंतर देशभरातून त्याचे कौतुक केले जात आहे. "ज्याच्या पाठीमागे १४० कोटी भारतीयांचे आशिर्वाद आहेत तो कधीच हरू शकणार नाही." असं नीरजचे चुलते भीम चोप्रा यांनी सांगितलं.

चांद्रयानाच्या यशानंतर आणखी एका भारतीय खेळाडून जगात आपला डंका वाजवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश बनला नीरज चोप्रा या यशानंतर जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT