Neeraj Chopra World Athletics Championships 2023 esakal
क्रीडा

Neeraj Chopra : लक्ष्य 90 मीटर! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरजकडून सुवर्ण पदकाची आशा; कधी अन् कुठं पाहायचा लाईव्ह सामना?

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra World Athletics Championships 2023 : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये अजून भारताचे खाते उघडेलेले नाही. संपूर्ण देशाला आता स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राकडून पदाची अपेक्षा आहे. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरजकडून भारताला वर्ल्ड चॅम्पियशिपमधील पहिल्या सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. संपूर्ण देशाची उत्सुकता लागून राहिलेला हा सामना कधी आणि कोठे लाईव्ह पाहायचा?

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 ची सुरूवात 19 ऑगस्ट पासून झाली आहे. या स्पर्धेचा शेवट हा 27 ऑगस्टला होता. भारताला या स्पर्धेत आतापर्यंत तरी सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. या स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जने लाँग जंम्पमध्ये कांस्य पदक पटकावले होते. गेल्या वर्षी नीराज चोप्राने रौप्य पदक पटकावले होते. यंदा तो सुवर्ण पदक पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरले.

नीराजचा सामना कधी आहे?

वर्ल्ड अॅथलेटिक्स 2023 पुरूष भालाफेक स्पर्धा ही 25 ऑगस्टला होणार आहे. भारतीय वेळानुसार दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पात्रता फेरी सुरू होईल. बेस्ट ऑफ थ्रीमधील पहिल्या 12 खेळाडूंना फायनलमध्ये प्रवेश मिळेल. त्यानंतर अंतिम सामना हा 27 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे.

सामना कुठं लाईव्ह दिसणार?

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 चे लाईव्ह स्ट्रीमिंग हे जिओ सिनेमावरून होत आहे. त्यामुळे चाहते नीरज चोप्राचा सामना फ्रीमध्ये लाईव्ह पाहू शकतात. नीरजसोबतच डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय पुरूष भालाफेकपटू देखील आपली दावेदारी सादर करणार आहेत.

कसा आहे नीरजचा सध्याचा फॉर्म?

भारताचा 25 वर्षाचा भालाफेकपटू नीरज चोप्राने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. त्याने दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर लांब भालेफेक करत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर लुसानेमध्ये देखील त्याने सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने दोन्ही स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असले तरी त्याचे मुख्य लक्ष्य हे 90 मीटर चा मार्क पार करणे हे आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो ही ऐतिहासिक कामगिरी करतो का हे पहावे लागले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

TRP पडला अन् 'ठरलं तर मग'मध्ये मोठी उलथापालथ; मालिकेत आणला सगळ्यात मोठा ट्विस्ट, प्रोमो व्हायरल

Japanese Beauty Secrets: वय वाढलं तरी त्वचा टवटवीत? जपानी महिलांच्या 5 ब्युटी सिक्रेट्स नक्की करा ट्राय

सासऱ्यांनी प्रॉपर्टीमधून बेदखल केलं, नणंदांनी केली कोर्ट केस ! मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात झालेली उलथापालथ

SCROLL FOR NEXT